काय नेमकं प्रकरण?
आत्महत्या जाणाऱ्या महिलेचे नाव दीप्ती मगर असे आहे. दीप्तीचा विवाह रोशन चौधरी याच्याशी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी झाला होता. दोन्ही कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. लग्नाच्या काही महिन्यांतच पती रोशन याने दीप्तीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. “तू माझ्या रूपाला साजेशी नाहीस, तुला घरकाम येत नाही,” अशा अपमानास्पद शब्दांत तो दीप्तीचा सातत्याने मानसिक छळ करत होता.
पाच वर्षांनंतर झाली मुलगी मात्र…
लग्नाच्या पाच वर्षानंतर दीप्ती आणि रोशनला बाळ झालं. त्यांना मुलगी झाल्याने सासरच्या मंडळींनी नाराजी व्यक्त केली. डिलिव्हरीनंतर दीप्ती सासरी नांदायला गेल्यावर व्यवसाय अडचणीत असल्याचे कारण दिले. आणि माहेरून पैसे आन अशी मागणी केली. दिप्तीने आपल्या माहेरून १० लाख रुपये दिले. त्यानंतर “लग्नात गाडी दिली नाही” या कारणावरून पुन्हा 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानुसार दीप्तीच्या माहेरच्यांनी रोख स्वरूपात रक्कम २५ लाख दिले.
दिप्तीला लग्नात मिळालेले २५ तोळे सोन्याचे दागिने सुरक्षिततेच्या कारणास्तव सासू-सासऱ्यांनी स्वतःकडे ठेवले होते. मात्र पुढे एका कार्यक्रमासाठी दागिने मागितले असता, ते नवीन व्यवसायासाठी गहाण ठेवल्याचे सांगण्यात आले.
गर्भात मुलगी असल्याचे समजताच…
ऑक्टोबर २०२५ मध्ये दीप्तीची सासू ही सरपंच झाली. त्यांनतर पुन्हा पैश्यांची मागणी करण्यात आली. मात्र यावेळी दिप्तीने नकार दिला. तेव्हा सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दीप्ती गर्भवती असतांना गर्भलिंग तपासणीसाठी दबाव टाकण्यात आला. पाच महिन्यांच्या गर्भात मुलगी असल्याचे निदान होताच त्यांनी जबरदस्ती सिझेरियनद्वारे गर्भपात करवून घेतला. एवढेच नाही तर दीप्तीच्या नावावर असलेली जमीन आणि फार्महाउस विकण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. असे गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आले आहे.
या सततच्या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळामुळे दीप्ती नैराश्यात गेली. २४ तारखेला तिने या सगळ्याला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी दीप्तीच्या आई सौ. हेमलता बाळासाहेब मगर (रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. उरुळी कांचन पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडाबळी तसेच गर्भलिंग तपासणी व गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या चार जणांचे नाव
रोहन कारभारी चौधरी (पती), सुनिता कारभारी चौधरी (सासू – सरपंच, सोरतापवाडी), कारभारी चौधरी (सासरे) आणि रोहित कारभारी चौधरी (दीर) असे आहे. हे सर्व आरोपी सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे येथील रहिवासी आहेत.
Ans: मुलगी नको म्हणून गर्भपाताचा दबाव आणि हुंड्याच्या पैशांसाठी छळ.
Ans: पती, सासू, सासरे आणि दीर अशा चौघांना अटक करण्यात आली.
Ans: पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत.






