Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मी सरकारचा भाग नाही, मी आमदार अन्…; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने भाजपमध्ये खळबळ

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 31, 2026 | 04:59 PM
मी सरकारचा भाग नाही, मी आमदार अन्...; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने भाजपमध्ये खळबळ

मी सरकारचा भाग नाही, मी आमदार अन्...; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने भाजपमध्ये खळबळ

Follow Us
Follow Us:

पुणे : ‘मी सरकारचा भाग नाही, मी आमदार आणि लोकप्रतिनिधी आहे. संवादाच्या टेबलवर मी बसत नाही,’ असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात होत असून, त्यासाठी मुनगंटीवार पुण्यात आले होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार संवादासाठी नेहमीच तयार असल्याचे सांगितले. ‘संवादातून समाधानाकडे जाण्याचा मार्ग असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही संवादासाठी तयार असल्याचे तीन वेळा सांगितले आहे,’ असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले. मात्र, मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या संवेदनशील मुद्द्यावर भाजपमध्येच वेगवेगळ्या भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

‘कुठे अडतंय, मला माहीत नाही’

सरकार संवादासाठी तयार असेल, तर नेमके अडतंय कुठे, असा प्रश्न मुनगंटीवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, ‘कुठे अडतंय, मला माहीत नाही. मी सरकारचा भाग नाही. मी आमदार आहे, लोकप्रतिनिधी आहे. संवादाच्या टेबलवर मी बसत नाही,’ असे स्पष्टीकरण दिले.

मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक : दानवे

बैठकीपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनीही माध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक असून योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. या विषयावर यापूर्वीही चर्चा झाल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : गणेशोत्सव, दहीहंडीत अंगविक्षेप कृष्णाला व गणपतीला आवडेल का? खासदार मेधा कुलकर्णींचा सवाल

मुंबईतही उद्या भाजपची बैठक

पुण्यातील राज्य कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर मुंबई भाजपची महत्त्वाची बैठक उद्या मंगळवार (दि.१) रोजी होणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात ही बैठक होणार आहे. आगामी राजकीय आणि संघटनात्मक रणनीतीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला मुंबई भाजपचे पदाधिकारी, प्रवक्ते, कार्यकारिणी सदस्य, मोर्चा-सेल आघाडी प्रमुख, खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, मंडल अध्यक्ष आणि वॉर्ड अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Sudhir mungantiwar commented in pune on manoj jarange patils agitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • BJP
  • Manoj Jarang patil
  • Sudhir Mungantiwar

संबंधित बातम्या

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
1

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Manoj Jarange Patil : ‘पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा’; मनोज जरांगे पाटील सरकारवर संतापले
2

Manoj Jarange Patil : ‘पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा’; मनोज जरांगे पाटील सरकारवर संतापले

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ
3

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ

Pune News : भाजपमध्ये मोठी खळबळ! रवींद्र चव्हाण यांची मोठी ऍक्शन! १०० नगरसेवकांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस
4

Pune News : भाजपमध्ये मोठी खळबळ! रवींद्र चव्हाण यांची मोठी ऍक्शन! १०० नगरसेवकांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.