Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत सुनेत्रा पवारांची अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना तंबी; अस्वच्छतेवरुन सुनावले खडेबोल

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन त्या ठिकाणी असलेल्या स्वच्छता व अस्ताव्यस्तपणाबाबत रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 11, 2026 | 01:14 PM
बारामतीत सुनेत्रा पवारांची अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना तंबी; अस्वच्छतेवरुन सुनावले खडेबोल
Follow Us
Follow Us:

बारामती/अमोल तोरणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती औद्योगिक वसाहतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन त्या ठिकाणी असलेल्या स्वच्छता व अस्ताव्यस्तपणाबाबत रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. त्यांच्या या अजितदादा स्टाईल आक्रमक भूमिकेचे बारामतीकरांनी स्वागत केले. बारामतीची घडी पूर्ववत बसवण्यासाठी त्यांनी याच पद्धतीने ठाम भूमिका घेत हीच कार्यशैली ठेवावी, अशी अपेक्षा बारामतीकारांनी व्यक्त केली आहे.

 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये काही प्रमाणात मरगळ आल्याचे चित्र आहे. अजित दादांच्या निधनामुळे बारामतीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या विकासाचा वेग कमी होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली आहे. पतीच्या निधनाचे मोठे असतानाही त्यांनी स्वतःला सावरत अजितदादादांप्रमाणे बारामतीमध्ये आल्यानंतर जनता दरबार सुरू केला आहे. त्यांचे चिरंजीव जय पवार हेदेखील आठवड्यातून एक दिवस जनता दरबार घेत आहेत.

दरम्यान रविवारी (दि ८) सुनेत्रा पवार यांनी बारामती शहरातील विविध विकासकामांना भेटी देऊन कामाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांना अनेक ठिकाणी अस्वच्छता आढळली, तसेच टाकाऊ औषधे दर्शनी भागात आढळून आले, यावेळी उपस्थित महिला कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. उपस्थितांची त्यांनी कानउघडणी केली. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर, बारामतीकरांसह राज्यातील जनतेने त्यांच्या या आक्रमक भूमिकेचे स्वागत केले आहे. अजितदादा गेल्यानंतर, बारामती शहरातील विविध ठिकाणी अस्वच्छता वाढू लागली आहे.

गुन्हेगारी रोखण्याचे दिले आदेश

बारामती बस स्थानकात देखील नियमित स्वच्छता होत नसल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर शहरांमध्ये गुन्हेगारी वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. अजित दादांनी मंजूर करून आणलेले विविध प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्याची आवश्यकता आहे. बारामती शहरामध्ये आणखी नवीन उद्योग घेण्यासंदर्भात, वरिष्ठ पातळीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा : नरेंद्र मोदींनी 12 वर्षात देश चुकीच्या दिशेला नेला, मोदी सरकारमध्ये ‘राम’ नाही अन्…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

मोठा प्रकल्प आणण्याची आवश्यकता

दरम्यान त्यांचे मोठे चिरंजीव खासदार पार्थ पवार हे देखील स्वतः बारामती शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. बारामतीची पूर्वीप्रमाणे उलाढाल वाढण्यासंदर्भात बारामती औद्योगिक वसाहतीमध्ये आणखी मोठा प्रकल्प आणण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यापुढे बारामतीचा विकासाचा वेग कायम सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान असले तरी, आक्रमक पद्धतीने काम करून शहर व तालुक्यातील गटातटातील राजकारणावरही लक्ष ठेवण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे.

Web Title: Sunetra pawar has reprimanded the officials and staff over the lack of cleanliness at the hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Sunetra ajit Pawar

संबंधित बातम्या

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; 2027 मध्ये आंतरराष्ट्रीय सायकलपटूंची स्पर्धा रंगणार
1

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; 2027 मध्ये आंतरराष्ट्रीय सायकलपटूंची स्पर्धा रंगणार

Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, ‘हे’ आहे कारण…
2

Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, ‘हे’ आहे कारण…

Baramati Theft News: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; ५१ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल केला लंपास
3

Baramati Theft News: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; ५१ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल केला लंपास

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक
4

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.