Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Bypoll Election Result 2026 : अभिजीत बिचूकलेंसह विरोधकांना मोठा धक्का; तिसऱ्या फेरीतच सुनेत्रा पवार 26773 मतांनी आघाडीवर

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांनंतर दोन्ही ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 04, 2026 | 12:09 PM
अभिजीत बिचूकलेंसह विरोधकांना मोठा धक्का; तिसऱ्या फेरीतच सुनेत्रा पवार 26773 मतांनी आघाडीवर

अभिजीत बिचूकलेंसह विरोधकांना मोठा धक्का; तिसऱ्या फेरीतच सुनेत्रा पवार 26773 मतांनी आघाडीवर

Follow Us
Follow Us:

Baramati Bypoll Election Result 2026 : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह राहिल्याने सुमारे ५८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या निवडणुकीत ७१.८६ टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात तीन लाख ८४ हजार ५७९ मतदार असून, त्यापैकी दोन लाख २४ हजार ८७ मतदारांनी मतदान केले. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांनंतर दोन्ही ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

 

बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह राहिल्याने सुमारे ५८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघात एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, मतमोजणीच्या सुरुवातीलाच सुनेत्रा पवार यांनी विरोधकांना मागे टाकत मोठी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरीअखेर सुनेत्रा पवार २६,७७३ मतांनी आघाडीवर आहेत. या आघाडीमुळे बारामतीत विरोधकांचे आव्हान सध्यातरी कमकुवत झाल्याचे दिसत आहे.

राहुरी पोटनिवडणूक: अक्षय कर्डिले यांचा एकतर्फी प्रभाव

भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीत पोटनिवडणूक होत आहे. येथे भाजपचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत अपेक्षित होती. अक्षय कर्डिले सध्या १४,७११ मतांच्या मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत.

हे सुद्धा वाचा : बारामतीच्या पाणी प्रश्नावर युगेंद्र पवारांची भूमिका स्पष्ट, ‘पवार vs पवार’ निवडणुकीवरही मोठं विधान; तर सुनेत्रा पवारांच्या…

निवडणुकीची पार्श्वभूमी

या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राजकीय स्तरावर प्रयत्न झाले होते, मात्र एकमत न झाल्याने मतदान प्रक्रिया राबवावी लागली. राहुरीतून एकूण ७ उमेदवार नशीब आजमावत आहेत. सद्यस्थिती पाहता बारामती आणि राहुरी या दोन्ही महत्त्वाच्या मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांनी विजयाच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे.

सुनेत्रा पवार यांची सोशल मीडियावरील पोस्ट

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असताना, आपण मतदानाच्या माध्यमातून दाखवलेल्या विश्वासाला मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना अर्पण करते. आज हा निकाल जाहीर होत असताना, आदरणीय दादांच्या आठवणी पुन्हा उजळून निघाल्या असून आपण सर्वजण भावूक झालो आहोत. दादांवर अपार प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की, या विजयाच्या आनंदात कोणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. बारामतीकरांनी मला दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. ही शेवट नाही, तर ही एक नवी सुरुवात आहे , निश्चयाची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!

Web Title: Sunetra pawar is leading by many votes in the baramati assembly by election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Abhijeet Bichukle
  • Baramati by-election
  • Baramati NCP
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम
1

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम

शेतकऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांची मोठी ग्वाही; ‘वाऱ्यावर सोडणार नाही’, नांदेडमध्ये नेमकं काय म्हणाल्या?
2

शेतकऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांची मोठी ग्वाही; ‘वाऱ्यावर सोडणार नाही’, नांदेडमध्ये नेमकं काय म्हणाल्या?

Sunetra Pawar: राज्यातील ७५% भागात दुष्काळ, सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी
3

Sunetra Pawar: राज्यातील ७५% भागात दुष्काळ, सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.