सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर; राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त (सौजन्य - एआय)
पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर धडक कारवाई करत संशयास्पद भेसळयुक्त, चुकीचे लेबल असलेले आणि निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ जप्त केले. विविध कारवायांमध्ये १० हजार ८३६.६५ किलो/लिटर अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची एकूण किंमत ३० लाख ८१ हजार ८८८ रुपये आहे. यात खवा-मावा, पेढे, तूप, तेल, बर्फी, चहा पावडर, मिठाई आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे.
पुणे विभागातील पुणे, सांगली आणि कोल्हापूर येथे सहा आस्थापनांवर कारवाई करून ४ लाख ७१ हजार २२३ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. पुण्यात चार आस्थापनांवर कारवाई झाली. वानवडीतील प्लाझा स्वीट्समधून ७,०४० रुपयांचे ११ किलो पेढे आणि २,५६० रुपयांचे आठ किलो बेसन लाडू जप्त करण्यात आले. शिवरकर रोडवरील सूरज स्वीट्समधून २१,८४० रुपयांचा ३९ किलो खोया आणि १५,३६० रुपयांचे २४ किलो मोदक जप्त करण्यात आले.
बी. टी. कवडे रोडवरील शिव डेअरीमधून ५८०० रुपयांचे ७.२५ किलो तूप जप्त करण्यात आले. लक्ष्मीनगर येथील स्वानंद स्वीट्स अँड डेअरीमधून ५८ हजार रुपयांचा १४५ किलो सुटा खोया, ११,०१८ रुपयांचे १४ किलो गायीचे तूप, १ लाख ३७ हजार ४४५ रुपयांचे १६५ किलो देसी तूप आणि १ लाख ८८ हजार ६४० रुपयांची ५२४ किलो स्किम्ड मिल्क पावडर जप्त करण्यात आली.
तक्रारीसाठी संपर्क
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा गैरप्रकाराबाबत नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा [अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रार पोर्टलवर](https://complaints.mahafda.in?utm_source=chatgpt.com) तक्रार नोंदवावी.
आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही
‘ग्राहकांच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. असुरक्षित अन्नपदार्थांची विक्री किंवा साठवणूक करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई सुरू राहील.’
– तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ
फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक सेठ यांनी मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट सहार येथील ‘रोमानो’ रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले असता त्यांच्या टेबलावर एक लहान झुरळ फिरताना दिसले. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करत हॉटेलमधील असुरक्षिततेवर आक्षेप घेतला आहे. डॉ. अशोक सेठ यांनी हे जेवण अर्धवट सोडून निघाले, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक सेठ यांनी या संपूर्ण घडलेल्या प्रकाराबाबत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अधिकारी (FDA) तुकाराम मुंडे यांना कारवाई करण्याची विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई






