Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : कृषी विभागाचा दणका; पुणे जिल्ह्यातील15 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

पॉस (POS) मशीनवरील नोंद आणि गोदामातील प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने पुणे जिल्ह्यातील १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने निलंबित केले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 19, 2026 | 12:45 PM
कृषी विभागाचा दणका; पुणे जिल्ह्यातील15 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

कृषी विभागाचा दणका; पुणे जिल्ह्यातील15 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Follow Us
Follow Us:

पुणे : पॉस (POS) मशीनवरील नोंद आणि गोदामातील प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने पुणे जिल्ह्यातील १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने निलंबित केले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे खत विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी ही माहिती दिली.

 

निलंबित करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये दौंड तालुक्यातील सर्वाधिक ७ केंद्रांचा समावेश आहे. १ एप्रिलपासून जिल्हाभरात युरिया खताच्या साठ्याची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान सुमारे ३५०० टन युरियाचा साठा केवळ कागदावर (पॉस प्रणालीत) असल्याचे समोर आले, जो प्रत्यक्षात विक्री होऊनही प्रणालीतून कमी करण्यात आला नव्हता. यामुळे खताच्या पुरवठा नियोजनात अडथळा येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तालुकानिहाय निलंबित कृषी सेवा केंद्रे

दौंड : अदिती कृषी सेवा केंद्र (लिंगाळी), बळीराजा ॲग्रो एजन्सी (देऊळगाव राजे), शिवकृपा ॲग्रो एजन्सी (पिंपळगाव), नंदाई ॲग्रो सर्व्हिसेस (नंदादेवी), बिरोबा कृषी सेवा केंद्र (बिरोबावाडी), श्रीराम कृषी भंडार (हिंगणी बेर्डे), श्रीनाथ ॲग्रो सर्व्हिसेस (राहू).

इंदापूर : महेश फर्टिलायझर (आगोती नंबर १), गणेश ॲग्रो एजन्सी (कळस).
जुन्नर : विघ्नहर कृषी सेवा केंद्र (नारायणगाव), कृषी शक्ती ॲग्रो एजन्सी (जुन्नर).
शिरूर : विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र (मांडवगण फराटा).
भोर : श्री भैरवनाथ शेती भांडार (वेळू).
आंबेगाव : शेतकरीराजा कृषी उद्योग (गावडेवाडी).

खत विक्रीवर बंदी, शेतकऱ्यांना आवाहन

ज्या १५ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, त्यांना निलंबन कालावधीत सर्व प्रकारच्या खतांची विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी देखील या केंद्रांकडून खते खरेदी करू नयेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पॉस मशीनवर साठा अद्ययावत न ठेवणे आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत ठेवणे ही गंभीर बाब असून, यापुढेही अशी तपासणी मोहीम सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा : प्रशासकीय कारभाराचा हिशोब द्या, सदस्यांची मागणी; जिल्हा परिषदेच्या सभागृहात संतापाचा स्फोट

Web Title: The agriculture department has suspended the licenses of 15 agricultural centers in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश
2

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
3

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
4

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.