Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indapur : इंदापूर नगरपरिषदेचा अर्थसंकल्प एकमताने मंजूर; ‘या’ कामांसाठी विशेष तरतूद

इंदापूर नगरपरिषदेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा सुधारित व प्रस्तावित अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 28, 2026 | 05:46 PM
इंदापूर नगरपरिषदेचा अर्थसंकल्प एकमताने मंजूर; 'या' कामांसाठी विशेष तरतूद

इंदापूर नगरपरिषदेचा अर्थसंकल्प एकमताने मंजूर; 'या' कामांसाठी विशेष तरतूद

Follow Us
Close
Follow Us:

इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा सुधारित व प्रस्तावित अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या बैठकीस नगराध्यक्ष भरत शहा अध्यक्षस्थानी होते. उपनगराध्यक्ष शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे, विरोधी पक्षनेते अनिल पवार, मुख्याधिकारी रमेश ढगे, सर्व नगरसेवक तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

 

नगराध्यक्ष भरत शहा यांनी अर्थसंकल्प सादर करताना शहराच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासावर भर दिला. पाणीपुरवठा सुधारणा, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता व आरोग्य सुविधा, रस्ते विकास, हरित उपक्रम, डिजिटल प्रशासन आणि मूलभूत पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे नागरिकांवर कोणतीही करवाढ न करता विकासकामे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

आर्थिक बाबींचा सविस्तर मांडला आढावा

मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी अर्थसंकल्पातील आर्थिक बाबींचा सविस्तर आढावा मांडला. मागील आर्थिक वर्षातील शिल्लक रक्कम १ कोटी १७ लाख ५४ हजार ८६ रुपये असून, सन २०२६-२७ साठी अंदाजित महसुली व भांडवली जमा १७८ कोटी ४९ लाख ४५ हजार रुपये अपेक्षित आहे. तर एकूण अंदाजित खर्च १७८ कोटी ९२ लाख २६ हजार ४०० रुपये इतका प्रस्तावित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत नवीन पाणीपुरवठा गटर योजना आणि विविध रस्ते प्रकल्पांना गती देण्यासाठी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, क्रीडा महोत्सव, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, संगणकीकरण व नागरिक सुविधा केंद्राच्या बळकटीकरणासाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : अजित पवारांच्या घातपाताचा संशय; बावडातील ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय

आवश्यक नागरी सुविधा उभारण्यासाठी आर्थिक नियोजन

वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्तार लक्षात घेऊन नवीन रस्ते, प्रशासकीय इमारत तसेच आवश्यक नागरी सुविधा उभारण्यासाठी आर्थिक नियोजन करण्यात आले आहे. सखोल चर्चेनंतर उपनगराध्यक्ष शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे आणि विरोधी पक्षनेते अनिल पवार यांनीही सकारात्मक सूचना मांडल्या. शहराच्या पारदर्शक, लोकाभिमुख आणि शाश्वत विकासासाठी हा अर्थसंकल्प दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करत सर्व सदस्यांनी एकमताने अर्थसंकल्पास मंजुरी दिली.

Web Title: The budget of indapur municipal council has been unanimously approved by all members

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Budget
  • indapur news

संबंधित बातम्या

Inflation Update : किचनचं Budget कोलमडलं! Iran Israel तणावामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कडाडल्या
1

Inflation Update : किचनचं Budget कोलमडलं! Iran Israel तणावामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कडाडल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.