Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या जागेवर उतरणार पहिल्यांदाच हेलीकॉप्टर; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची जोरदार चर्चा

पुरंदर विमानतळ प्रकल्पांतर्गत येणाऱ्या खानवडी गावात मुख्यमंत्री हेलीकॉप्टरने येणार आहेत. हेलीकॉप्टर याच गावात उतरणार असल्याने याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 10, 2026 | 05:40 PM
पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या जागेवर उतरणार पहिल्यांदाच हेलीकॉप्टर; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची जोरदार चर्चा

पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या जागेवर उतरणार पहिल्यांदाच हेलीकॉप्टर; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची जोरदार चर्चा

Follow Us
Follow Us:

सासवड : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री शनिवारी (दि 11) पुरंदरला येत आहेत. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षनिमित्त विविध उपक्रमांची घोषणा करण्यात येणार आहे. दरम्यान विमानतळ प्रकल्पांतर्गत येणाऱ्या खानवडी गावात उपक्रम असून, मुख्यमंत्री हेलीकॉप्टरने येणार आहेत. हेलीकॉप्टर याच गावात उतरणार असल्याने याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

 

खानवडीतील जोती सावित्री इंटरनेशनल स्कूलचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते पार पडणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तसेच जवळपास निम्मे मंत्रिमंडळ त्याचबरोबर राज्यमंत्री, राज्यातील खासदार, आमदार आणि संपूर्ण प्रशासन उपस्थित राहणार आहेत.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी अशा सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्यात येणार असून, यासाठी जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे. १२८५ हेक्टर म्हणजे ३ हजार एकर क्षेत्रावर विमानतळ प्रकल्प उभारण्याचे जाहीर करून पहिल्या टप्प्यात ३००० एकर क्षेत्र संपादित करण्याचे निश्चित केले.

यास जवळपास ९४ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिल्याचे सांगून प्रत्यक्ष जमीन मोजणीही पूर्ण झाली आहे. प्रकल्पासाठी एखतपुर २०१ हेक्टर, खानवडी २६६ हेक्टर, कुंभारवळण २५५ हेक्टर, मुंजवडी ७७ हेक्टर, पारगाव १८८ हेक्टर, उदाचीवाडी ४५ हेक्टर आणि वनपुरी १७५ हेक्टर याप्रमाणे एकूण तीन हजार एकर ( १२८५ हेक्टर ) याप्रमाणे क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक पार पडली असून एकरी किती भाव देणार ? शेतकऱ्यांचे पुनर्वसन कसे करणार ? असे प्रश्न सर्वत्र उपस्थित करण्यात येत आहेत.

विमानतळ प्रकल्प जाहीर केलेल्या गावात मुख्यमंत्र्यांसह इतर काही मंत्र्यांना घेऊन हेलीकॉप्टर याच खानवडी गावात उतरणार आहे. विशेष म्हणजे तालुक्याच्या इतिहासात प्रथमच खानवडी गावात हेलीकॉप्टर येणार असून, विमानतळ प्रकल्प होण्यापूर्वीच हेलीकॉप्टर उतरणार असल्याने याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांचा प्रकल्पाला अद्यापही विरोध असल्याने विरोध आज दिसणार का ? मुख्यमंत्री विमानतळ प्रकल्पाबाबत काय घोषणा करणार ? शेतकऱ्यांना परतावा आणि एकरी भाव जाहीर करणार का ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: The chief ministers helicopter will land for the first time at the purandar airport project site

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • helicopter
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

महसुलात अव्वल पुण्याला अधिकाऱ्यांचा दुष्काळ! जिल्ह्यात 27 पैकी 21 दुय्यम निबंधक पदे रिक्त
1

महसुलात अव्वल पुण्याला अधिकाऱ्यांचा दुष्काळ! जिल्ह्यात 27 पैकी 21 दुय्यम निबंधक पदे रिक्त

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर
2

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर

दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?
3

दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?

Purandar Airport : पुरंदर विमानतळाबाबत मोठी अपडेट; ‘या’ तारखेपर्यंत बाधित सर्व शेतकऱ्यांना मोबदला मिळणार
4

Purandar Airport : पुरंदर विमानतळाबाबत मोठी अपडेट; ‘या’ तारखेपर्यंत बाधित सर्व शेतकऱ्यांना मोबदला मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.