Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नात सोनं देण्याची प्रथा दरवाढीमुळे मोडतेय! 21 तोळ्यावरून थेट एक ते दोन तोळ्यांवर आली बोलणी

ऐन लग्नसराईत वधूपित्यांची चिंता वाढली आहे. पूर्वी विवाहात ११ ते २१ तोळे सोने वधूच्या अंगावर घालण्याची प्रतिष्ठेची परंपरा होती. मात्र, आता सोन्याच्या दरवाढीमुळे ही परंपरा अक्षरशः मोडीत निघाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 13, 2026 | 06:46 PM
लग्नात सोनं देण्याची प्रथा दरवाढीमुळे मोडतेय! 21 तोळ्यावरून थेट एक ते दोन तोळ्यांवर आली बोलणी

लग्नात सोनं देण्याची प्रथा दरवाढीमुळे मोडतेय! 21 तोळ्यावरून थेट एक ते दोन तोळ्यांवर आली बोलणी

Follow Us
Follow Us:

देहूगांव/बद्रीनारायण घुगे : सोन्याच्या दराने नव्या उच्चांकाला गवसणी घातली आहे. यामुळे ऐन लग्नसराईत वधूपित्यांची चिंता वाढली आहे. पूर्वी विवाहात ११ ते २१ तोळे सोने वधूच्या अंगावर घालण्याची प्रतिष्ठेची परंपरा होती. मात्र, आता सोन्याच्या दरवाढीमुळे ही परंपरा अक्षरशः मोडीत निघाली आहे. आता वधूसाठी फक्त एक-दोन तोळे सोन्याचे दागिने घातले जात आहेत. सोन्याच्या दरवाढीमुळे यापुढे अव्वाच्यासव्वा सोने वधूला घालण्याची परंपरा आणखी कमी व्हावी, असाच सूर वधूच्या पालकांमधून व्यक्त होत आहे.

 

वर्षानुवर्षे बचत करून ठेवलेले पैसे मुलीच्या लग्नासाठी पुरेसे ठरत. आता सोन्याची बेसुमार दरवाढ झाल्याने तोळाभर सोन्याची खरेदीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. सध्या सोन्याचा दर दीड लाखांवर गेला आहे. परिणामी, विवाहसोहळ्यांतील देवाणघेवाणीच्या पारंपरिक पद्धतीतही बदल झाला आहे. पूर्वी विवाह जमवताना ११, १५ किंवा २१ तोळे सोने वधूच्या अंगावर घालण्याची चर्चा लग्नाच्या बोलणीप्रसंगी होत असे. आता मात्र तोळाभर सोने तरी कसे जमवावे, असा गहन प्रश्न वधुपित्यासमोर आहे.

सोन्याचे दर गगनाला भिडल्याने लग्नसराईच्या हंगामात वधूपित्यांची अक्षरशः दमछाक होत आहे. टेपल, अॅटींग, बंगाली हार यासारखे कमी वजनाचे दागिने लगात देण्याचा कल वाढला आहे. हे दागिने कमी वजनात तयार होतात. त्यामुळे या दागिने खरेदीकडे अधिक कल आहे. वधूपित्याकडून हल्ली एक-दोन तोळ्यांपेक्षा जादा सोने खरेदी होत नाही. – व्हि. के. माळी, ज्वेलर्स व्यापारी, देहूगांव.

नवी अनुकरणनीय प्रथा

विवाह सोहळ्यात बांगड्या, पाटल्या, गोट, तोडे, बाजूबंद, छोटे मंगळसूत्र, नेकलेस, लक्ष्मीहार, मोठे मंगळसूत्र, कमरपट्टा, कानातील फुले-झुबे-वेल, नथसारखे दागिने वधूपित्याकडून कन्यादानात आंदण म्हणून दिले जात. आता सोने प्रति ग्रॅम दीड लाखापेक्षा जादा झाल्याने सोने खरेदी करताना वधूपित्यांचे कंबरडे मोडते. त्यामुळे आता एक-दोन तोळेच सोने नवरीच्या अंगावर घालण्याची नवी अनुकरणनीय प्रथा सुरू झाली आहे.

सोन्याच्या दरवाढीमुळे हल्ली अनेक ठिकाणी वधू पक्षाकडून वर पक्षाला लग्नाचा खर्च आम्ही करतो, पण सोने तुम्ही घ्या, अशा पद्धतीची बोलणी होत आहे. काही ठिकाणीतर मुलीसाठी आम्ही एक, दोन तोळे सोने देऊ उर्वरित खर्च वर पक्षाने उचलावा, अशी भूमिका वधूपिता घेत आहेत. यामुळे वधूसाठी लग्नात २१ तोळ्यावरून थेट एक-दोन तोळ्यांवर दागिन्यांची सद्दी आल्याचे दिसत आहे. एकंदरीत, सोन्याच्या दरवाढीने लग्नसराईची चमक कमी केली असून, वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरांना धक्का बसल्याचे दिसून येत आहे. – माणीक गाडे, माजी सरपंच शेतकरी सुदुंबरे

Web Title: The custom of giving gold at weddings is breaking down due to the rise in gold prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • Gold Jewelry
  • Gold Price
  • pune news

संबंधित बातम्या

‘माझ्या राजीनाम्याची मागणी केली…’; MPSC पेपर फूटीवरून अध्यक्ष विवेक भीमनवार काय म्हणाले?
1

‘माझ्या राजीनाम्याची मागणी केली…’; MPSC पेपर फूटीवरून अध्यक्ष विवेक भीमनवार काय म्हणाले?

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम
2

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
3

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

‘पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर’ प्रकल्पाची ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पाहणी
4

‘पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर’ प्रकल्पाची ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.