संग्रहित फोटो
मिळालेल्या माहितीनुसार, भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर दरोडा टाकण्यासाठी सात ते आठ जणांची टोळी काही वेळापासून टेहळणी करीत होती. गावात काही तरुण चादरी विक्रीसाठी फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले होते. त्यामुळे त्यांच्या हालचालींकडे कुणाचे विशेष लक्ष गेले नाही. मात्र, याच चादरी विक्रेत्यांच्या वेशातील तरुणांच्या मनात बॅंक लुटण्याचा डाव शिजत असल्याचे नंतर उघड झाले. बँकेतील कर्मचाऱ्यांची जेवणाच्या सुट्टीसाठीची वेळ साधत टोळीने अचानक बँकेत प्रवेश केला. हातात शस्त्रे आणि बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी बॅंक कर्मचाऱ्यांना एका जागी रोखून धरले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांची अक्षरशः घाबरगुंडी उडाली. त्यानंतर दरोडेखोरांनी स्ट्रॉग रूममधील लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या बिस्किटांसह दागिन्यांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. हाताला लागेल तेवढी रोकडही बॅगांमध्ये भरण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
पळून जाण्याच्या प्रयत्नात गावकऱ्यांचा प्रतिकार
बँकेतील गोंधळाची माहिती बाहेर येताच गावकऱ्यांना संशय आला. चादरी विक्रीच्या बहाण्याने गावात फिरणारे तरुणच या दरोड्यात सहभागी असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. यावेळी दरोडेखोर आणि गावकऱ्यांमध्ये झटापट झाली. काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले, तर तिघांना गावकऱ्यांनी पकडून ठेवले. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलिसांकडून चौकशी सुरू; चार जण ताब्यात
भोकर येथील स्टेट बॅंक दरोडा प्रकरणात धरणगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत धडाकेबाज कारवाई करत चावलखेडा रेल्वे बोगद्याजवळ दोन संशयितांना बेड्या ठोकल्या, शंकर रमेश जासक (वय ४२, रा. मुक्ताईनगर, सध्या जळगाव) आणि गजानन राजेंद्र पवार (वय ३२, रा. नायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी नाकाबंदी करून दोघांना पकडले. त्यांच्याकडून संशयास्पद बॅगा जप्त करण्यात आल्या असून, त्यात दरोड्यातील रोकड किवा सोन्याचे दागिने असण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांच्या मदतीने यापूर्वी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Ans: जळगाव तालुक्यातील भोकर गावातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शनिवारी दुपारी दरोड्याचा प्रयत्न झाला.
Ans: आरोपी चादरी विक्रेत्यांच्या वेशात गावात फिरत होते. त्यांनी बँकेची रेकी करून कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या सुट्टीची वेळ साधत बंदुकीचा धाक दाखवून बँकेत प्रवेश केला.
Ans: गावकऱ्यांनी सुरुवातीला तिघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतले. दिलेल्या माहितीनुसार, एकूण पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत.






