संग्रहित फोटो
बंडगार्डन पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अमोल धुमाळ तसेच पोलिस हवालदार तुषार आल्हाट यांना निलंबित करण्यात आले आहे. बंडगार्डन पोलिसांत एका हॉटेलविरोधात आप्रवास आणि परदेशी नागरिक अधिनियम, २०२५ गुन्हा नोंद आहे. यागुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक अमोल धुमाळ यांच्याकडे होता. तर, पोलिस हवालदार आल्हाट हे धुमाळ यांचे मदतनीस म्हणून कर्तव्य बजावतात. या गुन्ह्यात परकीय नागरिकांच्या वास्तव्याची माहिती देण्यासंदंर्भात या गुन्ह्यात स्टाफपासून जीएम (जनरल मॅनेजर) पर्यंत एकूण पाच आरोपी होते.
दरम्यान, गुन्ह्याच्या तपासादरम्यान हॉटेल मॅनेजर तेजस धुळबुळू हे चौकीत भेटण्यास आले होते. त्यावेळी या गुन्ह्यात पाच आरोपी असताना आरोपी संख्या कमी करण्यासाठी तसेच एकालाच कोणाला तरी अटक करण्यासाठी उपनिरीक्षक धुमाळ यांनी मॅनेजर तेजस धुळबूळ यांना काही एक न बोलता हातांची दोन बोटे दाखविली. नंतर मदतनीस आल्हाट हे तुमच्याशी बोलतील असे सांगितले. त्यानंतर आल्हाट यांनी दोन बोटे म्हणजे दोन लाख रुपये द्यावे लागतील असे समोर आले. यासंदंर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर दोघांचेही निलंबन करण्यात आले आहे.
५ हजारांची मागणी करणारा कर्मचारी निलंबित
पोलिस मुख्यालयात नेमणूक असताना देखील मुंबई-बेंगलोर महामार्गावर गणवेशात थांबून कंटेनर चालकाकडे ५ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या पोलिस शिपाई बाबुराव पोपट ढोले याला निलंबित केले आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांत गुन्हा नोंद असून, याप्रकरणी बाबुराव ढोले याला अटक केली आहे. मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.
अल्पवयीन मुलीला मारहाणप्रकरणी निलंबित
मांजरी भागातील अल्पवयीन मुलाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार राहुल चौधरी याला निलंबित करण्यात आले आहे. परिमंडळ चारचे उपायुक्त चिलूमूला रजनिकांत यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
Ans: पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कारवाईत दोन दिवसांत एकूण आठ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विविध कारणांमुळे निलंबन करण्यात आले.
Ans: पोलिस उपनिरीक्षक अमोल धुमाळ आणि पोलिस हवालदार तुषार आल्हाट यांना हॉटेलमधील गुन्ह्याच्या तपासादरम्यान दोन लाख रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणात निलंबित करण्यात आले.
Ans: महामार्गावर कंटेनर चालकाकडे पाच हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी पोलिस शिपाई बाबुराव ढोले, तर अल्पवयीन मुलाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी पोलिस हवालदार राहुल चौधरी यांना निलंबित करण्यात आले.






