सौजन्य - नवराष्ट्र टीम
विशेषतः गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर जमलेल्या गर्दीचे संयमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करण्यात पोलिसांची महत्त्वाची भूमिका राहिली. या उल्लेखनीय कामगिरीची विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टने दखल घेत डेक्कन जिमखाना येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी यांचा राष्ट्रीय लॉन टेनिसपटू अर्जुन कढे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी डेक्कन पोलीस ठाण्याच्या रुणाल मुल्ला यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी नगसेवक सुनील पांडे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका मिताली सावळेकर, नगरसेवक अपूर्व खाडे यांच्यासह प्राची बगाटे, श्याम मारणे, गायत्री लांडे, वैभव जमदाडे, शंकर मोटे, दिनेश अंबुरे, अभिजीत मोडक, हर्षवर्धन राजोपाध्ये आणि योगेश जोगळेकरही उपस्थित होते. गणेशोत्सव हा शहरातील मोठा आणि गर्दीचा उत्सव असल्याने या काळात पोलीस यंत्रणेवर मोठी जबाबदारी असते. उत्सवाच्या काळात पोलिसांनी बजावलेल्या कर्तव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती नवयुग मित्र मंडळ ट्रस्टने दिली.






