Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप- राष्ट्रवादीतील वाद पेटला; नगरसेवकाचा निधी काढून घेतल्याच्या विरोधात आंदोलन

सत्ताधारी भाजपने नगरसेवकांचा निधी काढून घेतल्याच्या विराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने महापालिकेत आंदाेलन केले. सत्ताधारी हुकुमशाही करीत असल्याचा आराेप यावेळी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 22, 2026 | 12:08 PM
भाजप- राष्ट्रवादीतील वाद पेटला; नगरसेवकाचा निधी काढून घेतल्याच्या विरोधात आंदोलन

भाजप- राष्ट्रवादीतील वाद पेटला; नगरसेवकाचा निधी काढून घेतल्याच्या विरोधात आंदोलन

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात महायुतीत सत्तेत असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या पक्षांमध्ये महापालिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्ताधारी भाजपने नगरसेवकांचा निधी काढून घेतल्याच्या विराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने महापालिकेत आंदाेलन केले. सत्ताधारी हुकुमशाही करीत असल्याचा आराेप यावेळी केला आहे.

नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांच्या प्रभागातील विकास निधी शून्य अथवा दुसऱ्या प्रभागात वर्ग करण्याच्या निर्णयाचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनील टिंगरे यांनी केले. महापालिकेतील विरोधी पक्षनेते निलेश निकम, अध्यक्ष सुभाष जगताप, आमदार चेतन तुपे पाटील, दीपक मानकर यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या इमारतीत हे आंदाेलन पार पडले. त्यानंतर सर्व नगरसेवकांच्या वतीने महापालिका आयुक्त नवल किशाेर राम यांना निवेदन देत निधी पुर्ववत करण्याची मागणी केली.

अमोल बालवडकर यांनी कोथरूड मतदारसंघातील विकासकामांबाबत चौकशीची मागणी करणाऱ्या प्रस्तावाला सुहास टिंगरे यांनी अनुमोदन दिल्यानंतर त्यांच्या प्रभागातील विकास निधी शून्य करण्याची कारवाई करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

हुकूमशाही पद्धतीच्या राजकारणाची शिक्षा पुणेकरांना का?

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयावर संताप व्यक्त करताना स्पष्ट भूमिका मांडली. नगरसेवक कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्या प्रभागातील विकास निधी हा त्या नगरसेवकाचा वैयक्तिक निधी नसून सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठीचा निधी आहे. राजकीय मतभेद असतील तर ते राजकीय पातळीवर सोडवावेत. मात्र एखाद्या नगरसेवकाने प्रश्न उपस्थित केला किंवा एखाद्या प्रस्तावाला अनुमोदन दिले म्हणून त्याच्या प्रभागातील विकासकामांचा निधी रोखणे अथवा दुसरीकडे वळवणे म्हणजे थेट त्या प्रभागातील नागरिकांवर अन्याय असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा : मायमर रुग्णालयात शिक्षिकेसह नवजात बाळाचा मृत्यू; उपचारातील हलगर्जीपणाच्या आरोपांनी खळबळ

निधी शून्य केल्याचा आरोप

बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी मंजूर करण्यात आलेला १.५ कोटींचा निधी शून्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शांती नगर येथील बुद्ध विहाराचा निधीही शून्य करण्यात आला.

Web Title: The ncp staged a protest against the bjp at the pune municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • Amol Balwadkar
  • NCP News
  • pune news

संबंधित बातम्या

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम; एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस
1

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम; एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद
2

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव
3

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल
4

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.