Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Today 2026: पेरूमध्ये मोठा भूकंप; रिश्टर स्केलवर 6.7 नोंदवली गेली तीव्रता

पारिनाकोचास प्रांताचे महापौर योनी रेयेस यांनीही सांगितले की, प्रांतीय राजधानीत कोणत्याही नुकसानीची नोंद झालेली नाही. नवीन भूकंपाचे धक्के बसल्यास किंवा नुकसान झाल्यास तात्काळ मदत पुरवता यावी, यासाठी अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 21, 2026 | 09:03 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today

Maharashtra Breaking News Updates Today

Follow Us
Follow Us:
  • 21 Aug 2026 09:03 AM (IST)

    21 Aug 2026 09:03 AM (IST)

    Nagpur Crime News: 'त्रिकोणी' प्रेमसंबंधातून नागपुरात कुख्यात गुंड गौरव रगडेची कुऱ्हाडीने वार करून हत्या 

    Nagpur Crime News: नागपूरच्या नरेंद्र नगर परिसरातील सुंदरबनमध्ये 'त्रिकोणी' प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून कुख्यात गुंड गौरव रगडे याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी त्याच्याच मित्रांनी कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी गौरव प्रभाकर राऊत आणि दीपक वासनिक या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

    मृत गौरव रगडे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न आणि दरोड्यासारखे सुमारे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रेमसंबंधातील वादातून मित्रांनीच मित्राचा गेम केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

  • 21 Aug 2026 08:30 AM (IST)

    21 Aug 2026 08:30 AM (IST)

    Central African Republic Gold Mine Collapse: मध्य आफ्रिकेत सोन्याच्या खाणीत दरड कोसळून १०० हून अधिक कामगारांचा मृत्यू 

    Central African Republic Gold Mine Collapse:  मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकाच्या (Central African Republic - CAR) पश्चिम भागात एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण दुर्घटना घडली आहे. येथील एका हाताने खणल्या जाणाऱ्या (Artisanal) बेकायदेशीर सोन्याच्या खाणीत अचानक मोठी दरड कोसळल्याने (Landslide) आतापर्यंत १०० हून अधिक कामगारांचा मृत्यू झाला आहे. खाणीच्या आत शेकडो कामगार काम करत असताना ही दुर्घटना घडल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • 21 Aug 2026 08:25 AM (IST)

    21 Aug 2026 08:25 AM (IST)

     Vande Mataram Controversy : शर्मिला टागोर यांचे वक्तव्य दुर्दैवी"; 'वंदे मातरम्'वरील विधानावर कंगना राणौतचा संताप, दिला मोफत सल्ला

    Vande Mataram Controversy :   बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी 'वंदे मातरम्' गीतासंदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरून सध्या नवा वाद पेटला आहे. "जे देवावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्यासाठी 'वंदे मातरम्'ची उर्वरित कडवी गाणे कठीण आहे," असे विधान शर्मिला टागोर यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून सोशल मीडियाद्वारे शर्मिला टागोर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कंगना राणौत यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक भलीमोठी पोस्ट शेअर करत शर्मिला टागोर यांच्या भूमिकेवर कडक शब्दांत आक्षेप घेतला आहे

  • 21 Aug 2026 08:20 AM (IST)

    21 Aug 2026 08:20 AM (IST)

    Imran Khan Shifted to Shifa Hospital Islamabad: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान रुग्णालयात दाखल 

    Imran Khan Shifted to Shifa Hospital Islamabad: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान (७३) यांना अखेर अडियाला जेलमधून बाहेर काढून इस्लामाबादमधील प्रसिद्ध शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात (Shifa International Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर (शुक्रवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास) अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तात त्यांना रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाभोवती सुरक्षा यंत्रणांचा मोठा वेढा तैनात करण्यात आला आहे.

  • 21 Aug 2026 08:15 AM (IST)

    21 Aug 2026 08:15 AM (IST)

    Kurla Crane Collapse Accident:  कुर्ल्यात जेसीबी उचलणारी क्रेन कोसळली; ८ ते १० जण जखमी 

    Kurla Crane Collapse Accident: मुंबईतील कुर्ला परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. एका क्रेनच्या सहाय्याने जेसीबी (JCB) मशीन उचलून शिफ्ट करण्याचे काम सुरू असताना अचानक क्रेनचा समतोल बिघडला आणि क्रेनसह ती जेसीबी मशीनही खाली कोसळली. या अनपेक्षित अपघातात सुमारे ८ ते १० जण जखमी झाले आहेत.

  • 21 Aug 2026 08:10 AM (IST)

    21 Aug 2026 08:10 AM (IST)

    Pune Crime : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला ठोकल्या बेड्या

    पुणे :  पुण्यासह राज्यभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याला आंबील ओढ्याजवळ सापळा रचून पकडण्यात यश आले आहे.

     

Maharashtra to National And International Breaking News:

Earthquake in Peru: पेरूमध्ये मोठा भूकंप; रिश्टर स्केलवर 6.7 नोंदवली गेली तीव्रता

इका : गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी भूकंप होताना दिसत आहे. त्यातच पेरू या देशामध्ये ६.७ तीव्रतेचा भूकंप झाला. दक्षिण पेरूभर तीव्र धक्के जाणवले. गुरुवारी पेरूच्या दक्षिण अँडीज पर्वतरांगेत ६.७ तीव्रतेचा भूकंप झाला. इका आणि अरेक्विपासह अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. आतापर्यंत कोणतीही मोठी हानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. वाचा सविस्तर- 

 

 

Web Title: Maharashtra breaking news today in marathi live blog national to international sports crime weather alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 08:04 AM

Topics:  

  • India news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
1

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

मतदारयादी शुद्धीकरणाचा भाजपलाच लाभ, २०२९च्या निवडणुकीत मोठा फायदा होईल; खासदार धनंजय महाडिक यांचा दावा
2

मतदारयादी शुद्धीकरणाचा भाजपलाच लाभ, २०२९च्या निवडणुकीत मोठा फायदा होईल; खासदार धनंजय महाडिक यांचा दावा

DSP Trophy Pune: ढोले पाटील अकादमीचा उपांत्य फेरीत प्रवेश; सार्थक हाबळेची शानदार खेळी
3

DSP Trophy Pune: ढोले पाटील अकादमीचा उपांत्य फेरीत प्रवेश; सार्थक हाबळेची शानदार खेळी

ठाकरे कलादालनावरून मीरा-भाईंदरमध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधाण; भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीने चर्चेला उधाण
4

ठाकरे कलादालनावरून मीरा-भाईंदरमध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधाण; भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीने चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.