Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नाथजल’ 15 रुपयांनाच द्या, अन्यथा…; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विक्रेत्यांना सज्जड दम

बसस्थानकांवरील प्रवाशांना 'नाथजल'ची थंडगार पाण्याची बाटली केवळ १५ रुपयांनाच मिळाली पाहिजे. असा कडक इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 30, 2026 | 11:40 AM
'नाथजल' 15 रुपयांनाच द्या, अन्यथा...; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विक्रेत्यांना सज्जड दम

'नाथजल' 15 रुपयांनाच द्या, अन्यथा...; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विक्रेत्यांना सज्जड दम

Follow Us
Follow Us:
  • ‘नाथजल’ १५ रुपयांनाच द्या
  • अन्यथा परवाना रद्द
  • प्रताप सरनाईक यांचा विक्रेत्यांना सज्जड दम
पुणे : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकांवरील प्रवाशांना ‘नाथजल’ची थंडगार पाण्याची बाटली केवळ १५ रुपयांनाच मिळाली पाहिजे. जर कोणीही अधिक दराने विक्री करताना आढळल्यास संबंधितांचा विक्री परवाना थेट रद्द केला जाईल, असा कडक इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी (३० एप्रिल) सकाळी पुणे विभागातील लोणावळा बसस्थानकास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी बसस्थानकावरील प्रवासी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.

 

पाहणी दरम्यान, प्रवाशांशी संवाद साधत असताना ‘नाथजल’च्या एक लिटर बाटलीसाठी २० रुपये उकळले जात असल्याचे काही प्रवाशांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. याची गंभीर दखल घेत सरनाईक यांनी संबंधित विक्रेत्याला जाब विचारला आणि तात्काळ स्पष्ट दरफलक लावण्याच्या सूचना दिल्या. यापुढे १५ रुपयांची बाटली महाग विकल्यास परवाना रद्द करण्याची तंबीही त्यांनी यावेळी दिली.

खाजगी हॉटेल्सवर थांबणाऱ्या बसेसना लगाम

लोणावळा बसस्थानकावर येणाऱ्या काही बसफेऱ्या स्थानकात न येता परस्पर पुढे जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. तसेच, अनेक बसेस जाणीवपूर्वक खाजगी हॉटेलांवर थांबवल्या जातात, जिथे खाद्यपदार्थ महाग असल्याने प्रवाशांची लूट होते. या तक्रारींची दखल घेत, “कोणतीही एसटी बस खाजगी हॉटेलवर थांबणार नाही, सर्व बसेसनी नियोजित वेळापत्रकानुसार लोणावळा बसस्थानकातच थांबले पाहिजे,” असे स्पष्ट निर्देश सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले.

हे सुद्धा वाचा : झटपट पैसे कमावण्याची हाव पडली भारी; आयटी इंजिनिअर तरुणीने गमावले सव्वा दोन कोटी

सुविधांचा आढावा आणि सुधारणांचे आदेश

या दौऱ्यात मंत्र्यांनी बसस्थानकातील स्वच्छता, प्रसाधनगृहे, तिकीट व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची सोय या मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. प्रवाशांना मिळणारी सेवा अधिक दर्जेदार आणि सुलभ असावी, यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आदेश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या आणि एसटी सेवेत पारदर्शकता व कार्यक्षमता आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे नमूद केले.

हे सुद्धा वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी शिवसेनेला मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का? काँग्रेसचा सवाल

Web Title: Transport minister pratap sarnaik pays a surprise visit to lonavala bus stand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • pratap sarnaik
  • pune news
  • Transport Minister Pratap Sarnaik

संबंधित बातम्या

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
1

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
2

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
3

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश
4

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.