संग्रहित फोटो
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती महेश नारायण भुसारे, विशाल नारायण भुसारे आणि प्रयागबाई नारायण भुसारे यांनी संगनमताने अश्विनी यांच्याकडे माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी वारंवार तगादा लावला. पैसे न आणल्यास जीवे मारण्याची धमकी देत मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून अश्विनी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी त्यांचे भाऊ गोपाळ नामदेव नाटकर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे विष्णुनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
हे सुद्धा वाचा : जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?
सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन
गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी वडिलांनी परवानगी न दिल्याने रागाच्या भरात चोपडा तालुक्यातील घुमावल येथील इयत्ता सहावीतील १२ वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घुमावल येथील एका कुटुंबातील १२ वर्षीय मुलाला गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी व्हायचे होते. मात्र, आई-वडिलांनी त्याला मिरवणुकीत जाण्यास परवानगी दिली नाही. याचा त्याला राग आला होता. त्यानंतर त्याने घरातील वरच्या मजल्यावर जाऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.






