Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवडमधील खड्डे 48 तासांत बुजवा, कामचुकारपणा केल्यास…; आयुक्तांचे महापालिका अधिकाऱ्यांना कडक निर्देश

रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजवण्याच्या दृष्टीने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 10, 2026 | 06:21 PM
पिंपरी-चिंचवडमधील खड्डे 48 तासांत बुजवा, कामचुकारपणा केल्यास...; आयुक्तांचे महापालिका अधिकाऱ्यांना कडक निर्देश

पिंपरी-चिंचवडमधील खड्डे 48 तासांत बुजवा, कामचुकारपणा केल्यास...; आयुक्तांचे महापालिका अधिकाऱ्यांना कडक निर्देश

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते, पदपथ आणि इतर सार्वजनिक सुविधांच्या दुरुस्तीच्या कामांना महापालिका प्रशासनाने गती दिली आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजवण्याच्या दृष्टीने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून पाहणी करा

नागरिकांच्या तक्रारींची वाट न पाहता सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि कनिष्ठ अभियंत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्राची नियमित पाहणी करून आवश्यक कामांची स्वतःहून नोंद घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खड्डे बुजवताना कामाचा दर्जा, टिकाऊपणा आणि नागरिकांची सुरक्षितता याबाबत विशेष दक्षता घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

सार्वजनिक सुविधांच्या दुरुस्तीलाही प्राधान्य

रस्त्यांवरील खड्ड्यांबरोबरच सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रेलिंग, दुभाजकांवरील बॅरिकेड्स आणि पदपथांची पाहणी करून दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी क्षेत्रीय कार्यालयानिहाय कामांचे नियोजन करून प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येत आहे.

कामचुकारपणा केल्यास कारवाईचा इशारा

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय व वॉर्डनुसार अभियंत्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सुरक्षेशी संबंधित कामांमध्ये दिरंगाई किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा डॉ. सूर्यवंशी यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा : अमोल बालवडकरांचा भाजपच्या तिरंगा रॅलीला जोरदार विरोध;15-20 हजार गाड्यामुळे वाहतूक कोंडीची भीती

रोज होणार कामांचा आढावा

दुरुस्तीच्या कामांवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त, मुख्य अभियंता आणि सह शहर अभियंता दररोज कामांचा आढावा घेतील. रोजच्या प्रगतीचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे.

नागरिकांना सुरक्षित, सुस्थितीत आणि दर्जेदार रस्ते व सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे महापालिका प्रशासनाचे मुख्य प्राधान्य आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तक्रारीची प्रतीक्षा न करता सक्रियपणे पाहणी करून दुरुस्ती पूर्ण करावी. कामांमध्ये हलगर्जीपणा आढळल्यास कठोर कारवाई निश्चित आहे. — डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

हे सुद्धा वाचा : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद

Web Title: The pimpri chinchwad municipal corporation commissioner has issued strict instructions to the officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • maharashtra
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
1

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
2

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
3

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.