बालुफ ऑटोमेशन करंडक टेबल टेनिस (फोटो- सोशल मिडिया )
प्रभात रोड (Pune) येथील सिम्बायोसिस स्कूल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत ११ वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित आरव बापटने अव्वल मानांकित नमन अग्रवालचा १०-१२, ११-८, ११-५, १२-१० असा पराभव करून विजेतेपद पटकावले. १५ वर्षांखालील मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित शरण्या पटवर्धन हिने शगुन गणेशेचा ११-७, ११-६, १-७ असा सहज पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. शरण्या ही बाल शिक्षण शाळेत आठवी इयत्तेत शिकत असून, एमडब्ल्यूटीटीए येथे सराव करते.
Table Tennis: सुयोग पाटीलची जिद्द अन् दमदार खेळ! पिछाडीवरून मुसंडी मारत पटकावले राज्यस्तरीय विजेतेपद
१५ वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम लढतीत सातव्या मानांकित वरदान कोलतेने नवव्या मानांकित नीरज नांदेडेचा ११-६, ७-११, ११-७, ११-५ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. वरदान हा एज्युकॉन इंटरनॅशनल शाळेत शिकत असून, लक्षवेध टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक अनिल बांदेल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
पुरुष गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित शौनक सानपूरकरने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दहाव्या मानांकित शौरेन सोमणचा ११-८, १२-१०, ६-११, ११-७, ११-४ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. ४० वर्षांवरील प्रौढ गटात अंतिम सामन्यात सातव्या मानांकित संतोष वाक्राडकरने अव्वल मानांकित स्वानंद बेडेकरचा ११-७, ११-८, ९-११, १३-११ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
Tennis: शौरेन सोमणची दमदार कामगिरी! १७ आणि १९ वर्षांखालील गटात विजेतेपदावर नाव कोरले
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सिम्बायोसिसचे संचालक डॉ. अमेय येरवडेकर आणि मिसेस ठिगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजीव बोडस, उपाध्यक्ष प्रकाश तुळपुळे, डॉ. उदय भालचंद्र, सचिव श्रीराम कोनकर, खजिनदार आशिष बोडस, सदस्य डॉ. मोहन उजगावकर, अजय सिधये, मुख्य पंच मधुकर लोणारे, सुरेंद्र देशपांडे यांची उपस्थिती होती.
Ans: जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा पुण्यातील सिम्बायोसिस स्कूल येथे पार पडली.
Ans: १५ वर्षांखालील गटात नीरज नांदेडेचा पराभव झाला.






