Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांना दिलासा! बांधकाम परवानगीसोबतच होणार जमीन ‘एनए’; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या वाचणार

महापालिका हद्दीतील शेतजमिनीवर बांधकाम करण्यासाठी स्वतंत्रपणे बिनशेती (एनए) परवानगी घेण्याची प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे. एनए परवानगीसाठी नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 29, 2026 | 05:39 PM
पुणेकरांना दिलासा! बांधकाम परवानगीसोबतच होणार जमीन ‘एनए’; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या वाचणार

पुणेकरांना दिलासा! बांधकाम परवानगीसोबतच होणार जमीन ‘एनए’; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या वाचणार

Follow Us
Follow Us:
  • बांधकाम परवानगीसोबतच होणार जमीन ‘एनए’
  • जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या वाचणार
  • सरकारच्या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा
पुणे : पुणे महापालिका हद्दीतील शेतजमिनीवर बांधकाम करण्यासाठी स्वतंत्रपणे बिनशेती (एनए) परवानगी घेण्याची प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे. प्रारूप, अंतिम किंवा प्रादेशिक विकास आराखडा लागू असलेल्या भागात संबंधित शेतजमीन निवासी क्षेत्रात दर्शविण्यात आली असल्यास बांधकाम परवानगी देतानाच अकृषक रुपांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे एनए परवानगीसाठी नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अधिनियम, २०२५ च्या अनुषंगाने राज्य शासनाने अकृषक परवानगी, सनद आणि स्वतंत्र अकृषक आकारणीची प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. बांधकाम विकास प्रस्ताव मंजूर करतानाच महापालिकेकडून एकरकमी अकृषक रुपांतरण अधिमूल्य आकारण्यात येणार आहे. हे अधिमूल्य भरल्यानंतर संबंधित जमिनीचे अकृषक वापरासाठी रुपांतरण झाल्याचे मानण्यात येईल.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार बांधकाम विकास शुल्क आणि अन्य शुल्कांसोबत अकृषक रुपांतरण अधिमूल्याची रक्कम दोन स्वतंत्र चलनांद्वारे भरून घेतली जाणार आहे. या अधिमूल्याच्या एकूण रकमेपैकी ७० टक्के हिस्सा राज्य शासनाला, तर ३० टक्के हिस्सा महापालिकेला मिळणार आहे.

रेडीरेकनरच्या बाजारमूल्यावर अधिमूल्य

चालू वर्षातील रेडीरेकनरनुसार जमिनीच्या बाजारमूल्यावर एकरकमी अकृषक रुपांतरण अधिमूल्य आकारण्यात येणार आहे.
१ हजार चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडासाठी : रेडीरेकनर दराच्या ०.१० टक्के

१ हजार १ ते ४ हजार चौरस मीटर भूखंडासाठी : ०.२५ टक्के

४ हजार १ चौरस मीटरपेक्षा अधिक भूखंडासाठी : ०.५० टक्के

वर्ग-१, वर्ग-२ जमिनींसाठीही अर्ज करता येणार

अर्जदाराची जमीन भोगवटादार वर्ग-१ किंवा वर्ग-२ ची असली तरी बांधकाम परवानगीसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र, बांधकाम परवानगी मिळाल्याने वर्ग-२ अथवा भाडेपट्ट्याच्या जमिनीच्या दर्जात कोणताही बदल होणार नाही.

भोगवटादार वर्ग-१ व्यतिरिक्त अन्य प्रकारच्या जमिनीच्या वापरात बदल करताना सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेऊन आवश्यक नजराणा अथवा अधिमूल्य भरणे बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा : आमदार शिरोळेंकडून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (लाईन ३) कामाची पाहणी; २०२६ मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याचा व्यक्त केला विश्वास

जिल्हाधिकारी कार्यालयाचा टप्पा रद्द

यापूर्वी शेतजमीन अकृषक करण्यासाठी बांधकाम परवानगीचा प्रस्ताव स्थानिक स्वराज्य संस्थेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येत होता. तेथे प्रस्तावाची तपासणी झाल्यानंतर अकृषक आकारणीचे चलन दिले जात असे. संबंधित रक्कम भरल्यानंतर सनद स्वरूपात एनए परवानगी मिळाल्यावरच बांधकाम सुरू करण्याची परवानगी दिली जात होती. आता ही स्वतंत्र आणि वेळखाऊ प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. बांधकाम परवानगी देतानाच अकृषक रुपांतरण अधिमूल्य आकारून संपूर्ण प्रक्रिया एकाच टप्प्यात पूर्ण केली जाणार असल्याने नागरिकांचा वेळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या वाचणार आहेत.

Web Title: The state government has taken a major decision regarding na permission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • chandrakant bawankule
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
1

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

पुण्यनगरीला प्रदूषणाचा विळखा! कोट्यवधी खर्च करून देखील समस्या कायम; शुद्ध हवा मिळणार कधी?
2

पुण्यनगरीला प्रदूषणाचा विळखा! कोट्यवधी खर्च करून देखील समस्या कायम; शुद्ध हवा मिळणार कधी?

खडकवासला धरणसाखळीत 88 टक्के पाणीसाठा; गेल्यावर्षी याच कालावधीत धरणसाठा होता 99.74 टक्के
3

खडकवासला धरणसाखळीत 88 टक्के पाणीसाठा; गेल्यावर्षी याच कालावधीत धरणसाठा होता 99.74 टक्के

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
4

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.