Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरेगाव-बिरदवडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना साकडे

बोरदरा, वराळे, गोणवडी आणि बिरदवडी परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था गंभीर झाली असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 14, 2026 | 04:40 PM
कोरेगाव-बिरदवडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना साकडे

कोरेगाव-बिरदवडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना साकडे

Follow Us
Follow Us:

चाकण : कोरेगाव फाटा ते बिरदवडी–आंबेठाण या प्रमुख मार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यायी ग्रामीण रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी बोरदरा, वराळे, गोणवडी आणि बिरदवडी परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था गंभीर झाली असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर बोरदरा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन बोरदरा–वराळे–गोणवडी–बिरदवडी या पर्यायी मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

कोरेगाव फाटा ते बिरदवडी–आंबेठाण या मुख्य मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना बराच वेळ रस्त्यावर अडकून राहावे लागते. त्यामुळे वेळेची नासाडी होत असून प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे

वाढत्या वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था

मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहनचालक वराळे, बोरदरा, गोणवडी आणि बिरदवडी या ग्रामीण मार्गांचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करीत आहेत. मात्र, या रस्त्यांची रचना आणि क्षमता पूर्वीच्या मर्यादित वाहतुकीनुसार असल्याने अचानक वाढलेल्या वाहनांच्या संख्येचा मोठा ताण या मार्गांवर पडत आहे. परिणामी रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. खराब रस्ता आणि वाढती वाहतूक यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच रोज प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा फटका बसत आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून प्रवासासाठी अधिक वेळ लागत आहे.

हे सुद्धा वाचा : चाकणमधील उद्योजकांच्या प्रश्नांवर ‘या’ तारखेला प्रत्यक्ष बैठक; उद्योगमंत्री उदय सामंत घेणार आढावा

रस्त्याची क्षमता, देखभालीकडे दुर्लक्ष

“मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे आमच्या गावातून मोठ्या प्रमाणात वाहतूक वळविली जात आहे. मात्र, वाढलेल्या वाहतुकीच्या तुलनेत या रस्त्याची क्षमता आणि देखभाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून तो वाहतुकीस सुरक्षित करावा,” अशी मागणी बोरदरा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन रस्त्याची सद्यस्थिती, वाढलेली वाहतूक आणि स्थानिक नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्यांची सविस्तर माहिती दिली. संबंधित विभागाला आवश्यक सूचना देऊन रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: The villagers have demanded the repair of the koregaon birdavadi road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Chakan News
  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra

संबंधित बातम्या

रास्त भाव दुकानाच्या नावाखाली धान्याचा काळाबाजार? करजखेड्यात बोगस सोसायटी ठरावांचा खेळ; कोट्यवधींच्या अपहाराचे गंभीर आरोप
1

रास्त भाव दुकानाच्या नावाखाली धान्याचा काळाबाजार? करजखेड्यात बोगस सोसायटी ठरावांचा खेळ; कोट्यवधींच्या अपहाराचे गंभीर आरोप

Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या आग्र्याहून सुटकेला ३६० वर्षे; शौर्य सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना
2

Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या आग्र्याहून सुटकेला ३६० वर्षे; शौर्य सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना

शासनाला घातला बारा लाखाचा गंडा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
3

शासनाला घातला बारा लाखाचा गंडा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

माजी उपमुख्यमंत्री बांदल यांच्यावरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
4

माजी उपमुख्यमंत्री बांदल यांच्यावरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.