Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे ‘झेडपी’त 7 स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; राज्यपालांची विधेयकावर स्वाक्षरी

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली 'स्वीकृत सदस्य' (नामित सदस्य) नियुक्ती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याच्या विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली असून, यासंदर्भात अधिकृत अध्यादेशही जारी करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 19, 2026 | 04:00 PM
पुणे 'झेडपी'त 7 स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; राज्यपालांची विधेयकावर स्वाक्षरी

पुणे 'झेडपी'त 7 स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; राज्यपालांची विधेयकावर स्वाक्षरी

Follow Us
Follow Us:

पुणे/आकाश ढुमेपाटील : गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली ‘स्वीकृत सदस्य’ (नामित सदस्य) नियुक्ती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याच्या विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली असून, यासंदर्भात अधिकृत अध्यादेशही जारी करण्यात आला आहे. राज्यपालांच्या या निर्णयामुळे आता ग्रामीण राजकारणातील अनुभवी कार्यकर्त्यांना ‘बॅकडोअर एन्ट्री’ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पुणे जिल्हा परिषदेत एकूण ७ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होण्याची शक्यता असून, यातील बहुतांश जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडण्याची चिन्हे आहेत. या निर्णयामुळे पुणे जिल्हा परिषदेत लवकरच ७ नवीन सदस्यांची वर्णी लागणार असून, राजकीय वर्तुळात आता कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगू लागली आहे.

 

राजकीय समीकरणे आणि जागांचे वाटप

नवीन नियमांनुसार, जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्के किंवा किमान ५ सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. पुणे जिल्हा परिषदेच्या बाबतीत ही संख्या ७ असण्याची शक्यता आहे. या जागांचे वाटप राजकीय पक्षांच्या संख्याबळाच्या आधारावर केले जाईल. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (५ जागा), भारतीय जनता पक्ष (१ जागा), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिंदे गट मिळून): १ जागा.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

१९९२ मध्ये ७३ व्या घटनादुरुस्तीनंतर जिल्हा परिषदांमधील स्वीकृत सदस्यांची तरतूद रद्द करण्यात आली होती. मात्र, प्रशासकीय कामात तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचा सहभाग असावा या उद्देशाने राज्य सरकारने गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही व्यवस्था पुन्हा सुरू करणारे विधेयक मंजूर केले होते.

महत्त्वाचे नियम

जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांमध्येही जास्तीत जास्त २ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करता येणार आहे.
अध्यादेशानुसार, जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर तीन महिन्यांच्या आत या सदस्यांची नियुक्ती करणे अनिवार्य असेल.

हे सुद्धा वाचा : “विमान अपघाताच्या अखेरच्या क्षणीही दादांच्या…”; जय पवारांनी जागवल्या अजितदादांच्या हृदयस्पर्शी आठवणी

जिल्हा परिषदेच्या सभागृहात संतापाचा स्फोट

पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय राजवटीत झालेल्या कारभाराचा हिशोब तात्काळ श्वेतपत्रिकेद्वारे द्यावा, अशी ठाम आणि आक्रमक मागणी सर्वसाधारण सभेत सदस्यांनी लावून धरली आहे. गेल्या चार वर्षांत नेमकी कोणती कामे झाली, कोणत्या योजना राबविल्या, मंजुऱ्या कशा मिळाल्या आणि जिल्हा नियोजन समितीकडे कोणते आराखडे सादर झाले, याची सविस्तर माहिती सभागृहासमोर ठेवण्याची मागणी करत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. ऐनवेळच्या विषयांत हा मुद्दा उपस्थित होताच वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते विजयसिंह शिंदे यांनी कानवडी येथील सीबीएसई शाळेच्या प्रवेश प्रक्रियेतील गोंधळावर थेट प्रश्न उपस्थित केले. ही प्रक्रिया नेमकी कशी राबवली? शाळा खासगी संस्थेला देताना कोणता करार झाला? असा थेट सवाल त्यांनी केला. पारदर्शकतेचा अभाव आणि वाढत्या तक्रारींमुळे प्रशासनाच्या कामकाजावर संशय निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.

Web Title: The way has been cleared for the appointment of 7 approved members in pune zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news
  • Pune Zilla Parishad

संबंधित बातम्या

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
1

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
2

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
3

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
4

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.