Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर ठरलं! पिंपरीतील डेअरी फार्म पूल कधी खुला होणार? महत्त्वाची माहिती समोर

पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उतारा ठरणारा आणि अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला डेअरी फार्म उड्डाणपूल आता पूर्णत्वाकडे सरकला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 06, 2026 | 04:40 PM
अखेर ठरलं! पिंपरीतील डेअरी फार्म पूल कधी खुला होणार? महत्त्वाची माहिती समोर

अखेर ठरलं! पिंपरीतील डेअरी फार्म पूल कधी खुला होणार? महत्त्वाची माहिती समोर

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उतारा ठरणारा आणि अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला डेअरी फार्म उड्डाणपूल आता पूर्णत्वाकडे सरकला आहे. या प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक टप्पा असलेले रेल्वे मार्गावरील स्टील गर्डर बसवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, येत्या एप्रिलअखेर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्धार महापालिकेने व्यक्त केला आहे.

 

रेल्वे ब्लॉक घेऊन गर्डरची जोडणी

पुलाच्या कामातील सर्वात जटिल भाग रेल्वे क्रॉसिंगचा होता. यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून विशेष ‘ब्लॉक’ घेण्यात आला आहे. नियोजनबद्ध पद्धतीने दररोज स्टील गर्डर बसवून त्यांची जोडणी केली जात आहे. गर्डरचे काम पूर्ण होताच स्लॅब टाकणे, डांबरीकरण आणि अंतिम फिनिशिंगची कामे वेगाने पूर्ण केली जाणार आहेत.

प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची होणार बचत

पिंपळे सौदागर, रहाटणी आणि पिंपरी कॅम्प या भागांतून पुणे-मुंबई महामार्गाकडे जाण्यासाठी डेअरी फार्म मार्ग हा मुख्य दुवा आहे. मात्र, येथील रेल्वे फाटकामुळे वाहनचालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. या पुलामुळे सुमारे १,२९० मीटरचा प्रवास विनाअडथळा होणार असून, परिसरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मोठी मदत होणार आहे.

अडथळ्यांची शर्यत पार

२०२३ मध्ये या कामाला सुरुवात झाली खरी, पण वृक्षतोड, तांत्रिक परवानग्या आणि रेल्वे विभागाच्या मंजुरी प्रक्रियेमुळे प्रकल्पाला विलंब झाला. मात्र, महापालिकेच्या स्थापत्य विभागाने सर्व तांत्रिक अडचणींवर मात करत आता प्रकल्पाला गती दिली आहे. एप्रिलअखेर हा पूल कार्यान्वित झाल्यास शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा : भामा-आसखेड जलवाहिनीचे काम पुन्हा वादात, दोषी ठेकेदारालाच पुन्हा ‘पायघड्या’? प्रशासकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

पुलाची ठळक वैशिष्ट्ये

घटक तपशील
एकूण लांबी १२९० मीटर
पुलाची रुंदी १७.२० मीटर
स्टील गर्डर ०७ नग
अपेक्षित मुहूर्त एप्रिल २०२४ अखेर

Web Title: The work on the dairy farm flyover in pimpri has entered its final stage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri Chinchwad
  • Ravi Landge

संबंधित बातम्या

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार
1

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार

Asian Games 2026: महाराष्ट्राच्या वाघिणीने चीनला उभा फाडला! प्रिथिकाने तिरंदाजीत पटकावले ‘सुवर्ण’
2

Asian Games 2026: महाराष्ट्राच्या वाघिणीने चीनला उभा फाडला! प्रिथिकाने तिरंदाजीत पटकावले ‘सुवर्ण’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.