Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Onion Price : चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा बाजार कोसळला; प्रतिकिलो दर किती?

सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि स्थानिक पातळीवरील वाढलेली आवक यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण येथे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 21, 2026 | 01:44 PM
चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा बाजार कोसळला; प्रतिकिलो दर किती?

चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा बाजार कोसळला; प्रतिकिलो दर किती?

Follow Us
Follow Us:

चाकण/ अतिश मेटे : सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि स्थानिक पातळीवरील वाढलेली आवक यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण येथे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या कांद्याला केवळ ८ ते ११ रुपये प्रति किलो दर मिळत असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत कांद्याला सुमारे २० रुपये प्रति किलो दर मिळत होता. मात्र यंदा परिस्थिती पूर्णतः उलटली आहे.

 

आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आणि इस्राईल, अमेरिका यांच्यातील युद्धामुळे भारतीय निर्यात व्यवहारावर परिणाम झाला आहे. परिणामी कांद्याची निर्यात मंदावली असून, बाजारभावावर दबाव वाढला आहे. यासोबतच, यंदा कांद्याचे उत्पादन चांगले झाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. मात्र मागणी कमी असल्याने दर घसरले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे.

यासंदर्भात कांदा-बटाटा आडते असोसिएशनचे अध्यक्ष नयन लांडे यांनी सांगितले की, “सध्याच्या परिस्थितीत कांद्याला अत्यंत कमी दर मिळत आहेत. निर्यात बंद असल्याने बाजारावर मोठा ताण आला आहे. आवक जास्त आणि मागणी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.”

दरम्यान, शेतकऱ्यांकडून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला योग्य दर मिळवून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, निर्यात सुलभ करावी आणि बाजार स्थिर ठेवावा, अशी मागणी होत आहे. सध्याच्या परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून, लवकर निर्णय न झाल्यास आर्थिक संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा : गॅस तुटवड्यावरून जनता आक्रमक; संतप्त नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्गच रोखला

मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत

कांद्याला सध्या ८ ते ११ रुपये प्रति किलो दर

मागील वर्षी याच काळात सुमारे २० रुपये दर

निर्यात मंदावल्याने बाजारावर दबाव

कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली

उत्पादन खर्चही निघणे कठीण

Web Title: There has been a big drop in onion prices at chakan agricultural produce market committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Chakan News
  • Farmers
  • onion price

संबंधित बातम्या

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
1

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
3

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

गळीत हंगामाआधी राजू शेट्टींची मोर्चेबांधणी! कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट; नेमकं काय चर्चा झाली?
4

गळीत हंगामाआधी राजू शेट्टींची मोर्चेबांधणी! कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट; नेमकं काय चर्चा झाली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.