Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळीचा गळा आवळतोय? पुणे जिल्ह्यातील केंद्रांच्या संख्येत लक्षणीय घट

अल्पदरात अन्न उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना पुणे जिल्ह्यात अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 10, 2026 | 01:50 PM
शिवभोजन थाळीचा गळा आवळतोय? पुणे जिल्ह्यातील केंद्रांच्या संख्येत लक्षणीय घट

शिवभोजन थाळीचा गळा आवळतोय? पुणे जिल्ह्यातील केंद्रांच्या संख्येत लक्षणीय घट

Follow Us
Close
Follow Us:
  • शिवभोजन थाळीचा गळा आवळतोय?
  • केंद्रांच्या संख्येत लक्षणीय घट
  • अनुदानात कोणतीही वाढ झालेली नाही
पुणे/ आकाश ढुमेपाटील : अल्पदरात अन्न उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना पुणे जिल्ह्यात अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. 2020 मध्ये सुरू झालेल्या या योजनेची व्याप्ती गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या घटली असून, एकेकाळी 86 केंद्रांवर उपलब्ध असलेली सेवा आता केवळ 14 ठिकाणी मर्यादित राहिली आहे.

 

योजनेमागील उद्दिष्ट सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे असले, तरी निधी वितरणातील विलंब आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे अंमलबजावणीवर परिणाम होत असल्याची तक्रार केंद्र चालकांकडून केली जात आहे. फेब्रुवारी 2026 पर्यंत 86 लाख रुपयांचे अनुदान वितरित झाले असले, तरी मार्च महिन्याचे अनुदान जूनमध्ये मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक प्रकरणांत बिले दीर्घकाळ प्रलंबित राहतात, असे सांगितले जाते. अलीकडील काळात आंबेगाव, बारामती, पुरंदर आणि हवेली तालुक्यांतील काही केंद्रे बंद पडली आहेत. निधी वेळेवर न मिळणे हे यामागील प्रमुख कारण असल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. बिल प्रक्रियेत तहसील व जिल्हा स्तरावरील टप्प्यांमुळे विलंब होत असल्याची नोंदही करण्यात येते.

2024-25 या आर्थिक वर्षात 21 केंद्रे कार्यरत होती; ती संख्या आता 14 वर आली आहे. आगामी काळात ही संख्या आणखी घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित वर्षासाठी 3 कोटी 12 लाख 75 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती; मात्र मंजूर निधी तुलनेने कमी राहिल्याचे दिसते. सध्या ग्राहकांना 10 रुपयांत थाळी दिली जाते. शहर भागात प्रति थाळी 40 रुपये, तर ग्रामीण भागात 25 रुपये अनुदान दिले जाते. मात्र, वाढती महागाई, इंधन खर्च आणि अन्नधान्यांच्या किंमती यामुळे हे प्रमाण अपुरे ठरत असल्याचे केंद्रचालकांचे म्हणणे आहे. 2020 पासून अनुदानात कोणतीही वाढ झालेली नसल्याची बाबही लक्षवेधी आहे.

हे सुद्धा वाचा : माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी वकील पाठवला; करुणा मुंडेंचा गंभीर आरोप

पुनरावलोकन आवश्यक

या पार्श्वभूमीवर, योजनेची उद्दिष्टे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांतील दरी वाढत असल्याचे दिसते. सामाजिक गरज लक्षात घेता निधीचे वेळेवर वितरण, प्रक्रियेतील सुलभता आणि अनुदान पुनरावलोकन याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: There has been a significant decrease in the number of shiv bhojan thali centers in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

अमृता खानविलकरला ‘नटरंग’ कलागौरव पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण
1

अमृता खानविलकरला ‘नटरंग’ कलागौरव पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण

Pune Section 144: पुणेकरांसाठी मोठी बातमी! आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू!  ८ जूनपर्यंत कडक निर्बंध
2

Pune Section 144: पुणेकरांसाठी मोठी बातमी! आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू! ८ जूनपर्यंत कडक निर्बंध

पांरपारिक पत्रांपासून ते डिजिटल सेवांपर्यंत… ; पुण्याच्या टपाल खात्याने स्वत:ला कसे बदललं? लोकांचा पोस्टमनवर ‘विश्वास’ कायम
3

पांरपारिक पत्रांपासून ते डिजिटल सेवांपर्यंत… ; पुण्याच्या टपाल खात्याने स्वत:ला कसे बदललं? लोकांचा पोस्टमनवर ‘विश्वास’ कायम

शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली, आधारभूत किमतींसाठी कठोर कायदा करा; जुन्नर तालुक्यातून सरकारला आर्त हाक
4

शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली, आधारभूत किमतींसाठी कठोर कायदा करा; जुन्नर तालुक्यातून सरकारला आर्त हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.