Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा प्रस्तावित माळशेज घाट–भोरांडे उदंचन जलविद्युत प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी जुन्नर तालुक्यातील हजारो नागरिकांनी आक्रमक आंदोलन केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 16, 2026 | 04:29 PM
माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

Follow Us
Follow Us:

ओतूर/ मनोहर हिंगणे : अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा प्रस्तावित माळशेज घाट–भोरांडे उदंचन जलविद्युत प्रकल्प रद्द करावा तसेच या प्रकल्पासाठी २१ ऑगस्ट रोजी होणारी पर्यावरण व प्रदूषणविषयक जनसुनावणी तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी मढ येथे आदिवासी बांधवांसह जुन्नर तालुक्यातील हजारो नागरिकांनी आक्रमक आंदोलन केले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी गाढव मोर्चा काढत अहिल्यानगर–कल्याण महामार्गावर रास्तारोको केला. पावसाची पर्वा न करता नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

या आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी वादळ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांनी केले. माजी आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य माई लांडे, सोनाबाई दाभाडे, पंचायत समिती सदस्य आशा डावखर, निलम आमले, अश्विन केदार, माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, दत्ता गवारी, लकी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.

आंदोलनस्थळी विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी तसेच जुन्नर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही आंदोलनाला उपस्थिती लावली. प्रस्तावित प्रकल्पाविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी गाढव, शेळ्या आणि मेंढ्या सोबत आणून आंदोलन केले. यावेळी ‘अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओ’, ‘प्रकल्प रद्द करा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यादरम्यान विविध मागण्यांचे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते. रास्तारोको सुरू असताना पावसाला सुरुवात झाली; मात्र आंदोलकांनी महामार्ग सोडला नाही. त्यामुळे अहिल्यानगर–कल्याण महामार्गावरील वाहतूक काही काळ मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. हजारो नागरिक एकत्र आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

‘आदिवासींच्या जमिनींवर डोळा ठेवणाऱ्यांना पाऊलही ठेवू देणार नाही’

यावेळी बोलताना देवराम लांडे यांनी प्रस्तावित प्रकल्पाला तीव्र विरोध केला. ते म्हणाले, “यापूर्वी धरणांसाठी आदिवासी बांधवच भरडले गेले आहेत. आमच्या हक्काचे पाणी इतरत्र नेले जात आहे; मात्र आम्हाला स्वतःच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. आदिवासींच्या जमिनींवर डोळा ठेवून त्यांचा छळ करणाऱ्या अदानीसारख्या उद्योगपतींना आमच्या भागात पाऊलही ठेवू देणार नाही.” समाजहितासाठी प्रसंगी जीव गेला तरी चालेल; मात्र माळशेज घाट–भोरांडे जलविद्युत प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशारा लांडे यांनी दिला. पुढील आंदोलन पुण्यात करण्यात येणार असून त्यामध्ये जुन्नर तालुक्यातील शिक्षित आदिवासी तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

‘आदिवासी समाजाबरोबर प्रकल्पाविरोधात लढणार’

माजी आमदार अतुल बेनके यांनीही प्रकल्पाला विरोध दर्शवत आदिवासी समाजासोबत लढा देण्याची भूमिका मांडली. “माळशेज घाट–भोरांडे जलविद्युत प्रकल्प रद्द करण्यासाठी सर्व आदिवासी समाजाबरोबर आपण लढणार,” असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बेनके यांनी आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकारांना दिलेल्या कथित धमकीचा तसेच लोकप्रतिनिधी व विविध समाजांबाबत वापरलेल्या कथित अरेरावीच्या भाषेचा निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत अशा प्रकारची राजकीय आणि सामाजिक संस्कृती योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी हा जनतेचा प्रतिनिधी असतो; तो केवळ उद्योगपती किंवा प्रशासनाचा प्रतिनिधी नसतो. जनतेचा आवाज मांडण्यासाठीच जनता लोकप्रतिनिधींना निवडून देते. एखाद्या भागातून मते कमी-जास्त मिळाली म्हणून त्या भागातील जनतेविषयी अपमानास्पद भाषा वापरणे योग्य नसल्याचे बेनके म्हणाले.

“पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.

पत्रकारांना धमकावणे किंवा अरेरावीची भाषा वापरणे योग्य नाही. लोकप्रतिनिधींचे काही चुकत असेल तर पत्रकारांनी त्यांना कानपिचक्या दिल्याच पाहिजेत,” अशी भूमिका त्यांनी मांडली. आमदार शरद सोनवणे यांनी यापूर्वी आदिवासी, रामोशी आणि पारधी समाजाबाबत कथितरीत्या चुकीची व अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोपही बेनके यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे जुन्नर तालुक्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा : चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

‘सांस्कृतिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक अस्तित्वावर गदा’

दरम्यान, आंदोलकांच्या म्हणण्यानुसार प्रस्तावित माळशेज घाट–भोरांडे उदंचन जलविद्युत प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक अस्तित्वावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्पाला मंजुरी देण्यापूर्वी स्थानिक नागरिकांच्या आक्षेपांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. २१ ऑगस्ट रोजी प्रस्तावित असलेली पर्यावरणविषयक जनसुनावणी रद्द करून प्रकल्पाचा प्रस्तावच मागे घ्यावा, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. याबाबत प्रशासनाने योग्य ती भूमिका न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Web Title: Thousands of citizens from junnar taluka have staged an aggressive protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • Adani Group
  • CM Devedra Fadnavis
  • junnar news
  • Protest

संबंधित बातम्या

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
1

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
2

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

‘९९% सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, स्वतःच्या जातीतील, वर्गातील लोकांनाच संधी’; बाबा रामदेवांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलनाचा इशारा
3

‘९९% सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, स्वतःच्या जातीतील, वर्गातील लोकांनाच संधी’; बाबा रामदेवांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलनाचा इशारा

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा
4

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.