Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Metro: जून महिन्यात ‘पुणे मेट्रो’चा रेकॉर्ड; तब्बल 52 लाख प्रवाशांनी केला प्रवास

महामेट्रोच्या वतीने वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गांवर सेवा सुरू आहे. दररोज सरासरी ७० हजारांहून अधिक नागरिक मेट्रोने प्रवास करत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 02, 2025 | 09:52 PM
Pune Metro, Hinjewadi Shivajinagar Metro, Pune Metro News

Pune Metro, Hinjewadi Shivajinagar Metro, Pune Metro News

Follow Us
Follow Us:
पुणे: पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जून महिन्यात एकट्या महिन्यात तब्बल ५२ लाख ५७ हजार प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक मासिक प्रवासी संख्या असून, मेट्रोने एका महिन्यातच ५० लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे.
महामेट्रोच्या वतीने वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गांवर सेवा सुरू आहे. दररोज सरासरी ७० हजारांहून अधिक नागरिक मेट्रोने प्रवास करत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील गणपती विसर्जनाच्या दिवशी एकाच दिवशी ३ लाख ४६ हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला होता.
मेट्रोच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात मेट्रोला एकूण २ कोटी ३३ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर मे महिन्यात ही आकडेवारी होती ४७ लाख ६२ हजार प्रवासी आणि उत्पन्न २ कोटी ७२ लाख रुपये. त्यामुळे प्रवासी आणि उत्पन्न दोन्हीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महिन्यानुसार मेट्रो प्रवासी आणि उत्पन्न

महिना प्रवासी संख्या उत्पन्न
मे ४७,६२,००० २.७२ कोटी
जून ५२,५७,००० २.३३ कोटी

Metro च्या ‘या’ टप्प्याला केंद्र सरकारची मंजूरी

 पुणे मेट्रोच्या दोन महत्वाच्या विस्तारीत मार्गांना केंद्र सरकारकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी झालेल्या बैठकीत वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी (वाघोली) या मेट्रो मार्गांना हिरवा कंदील दाखवला आहे. एकूण सुमारे ३,७५६.५८ कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे पुणे मेट्रोचा शहराच्या दोन दिशांना विस्तार होणार असून, नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे.

पुणेकरांसाठी खुशखबर! Metro च्या ‘या’ टप्प्याला केंद्र सरकारची मंजूरी; कसा असणार प्रोजेक्ट? पहाच…
या दोन्ही प्रकल्पांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा प्रत्येकी 20  वाटा असून उर्वरित 60% निधी हा महा-मेट्रोमार्फत कर्जाच्या स्वरूपात उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना गती मिळणार असून लवकरच टेंडर प्रक्रिया आणि प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार आहे. पुणेकरांसाठी हा निर्णय म्हणजे वाहतूक कोंडीवरचा उपाय आणि वेगवान प्रवासासाठी एक मोठं पाऊल ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पुर्वेकडील आयटी हब मेट्रोने जोडले जाणार आहे. वनाज ते चांदणी चौक (मार्गिका २अ) या विस्तारित मार्गावर २ स्थानके (कोथरूड बस डेपो, चांदणी चौक) असून, त्याची लांबी १.२ किमी असणार आहे. यामुळे वनाज ते चांदणी चौक परिसरातील नागरिकांना मेट्रोची सुविधा  उपलब्ध होईल.

Web Title: Total 52 lakhs passengers travel with pune metro route

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 09:52 PM

Topics:  

  • metro news
  • Pune
  • Pune Metro

संबंधित बातम्या

Hockey National Championship: यजमान महाराष्ट्राला धक्का, पण झारखंड-हरियाणाचा दणदणाट!
1

Hockey National Championship: यजमान महाराष्ट्राला धक्का, पण झारखंड-हरियाणाचा दणदणाट!

Ranjangaon MIDC Traffic Jam: चाकणनंतर रांजणगावातील उद्योगही स्थलांतरित होणार?
2

Ranjangaon MIDC Traffic Jam: चाकणनंतर रांजणगावातील उद्योगही स्थलांतरित होणार?

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद
3

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.