Photo Credit : Team Navrashtra (शरद पवारांनी डाव टाकला)
बारामती : महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या वाद काहीसा शमला असतानाच शरद पवार यांनी आपला पहिला डाव टाकला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आतापर्यंत 50 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. यात युगेंद्र पवार यांचेही नाव समोर आले आहे. त्यामुळे बारामतीतून युगेंद्र पवार विरूद्ध अजित पवार असा सामना रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत युगेंग्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. त्यानंतर बारामतीतील युगेंद्र पवार यांच्या समर्थकांनीही बारामतीला नवा दादा हवाय अशी मागणी करत युगेंद्र पवार यांना संधी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून युगेंद्र पवार यांनाही एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात पुतण्या उभा राहणार हे निश्चित झाले आहे.
हेही वाचा: महाविकास आघाडीचे झाले जागावाटप?; काँग्रेसचा वरचष्मा तर शरद पवार गटाला कमी जागा…
निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. पण महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटपच अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे उमेदवार जाहीर कऱण्यास उशीर होत आहे.त्यामुळे शरद पवार यांनी आपल्या काही निश्चित उमेदवारांना एकाच दिवसात 50 एबी फॉर्मचे वाटप केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पक्षासोबत असलेल्या सर्व आमदारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत.
मराठवाडा आणि विदर्भातील उमेदवारांना एबी फॅार्म देण्यात आले आहेत. तर बारामते युगेंद्र पवार आणि मुंबईतून घाटकोपर पूर्व विधानसभेच्या उमेदवार राखी जाधव यांनाही एबी फॉर्म देण्यात आले आहेत. AB फॅार्म देताच पक्षाच्या वरिष्ठांकडून उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा: दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मी जन्मली! लग्नाच्या 9 वर्षांनंतर दृष्टि- नीरज झाले आई-बाबा