दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मी जन्मली! लग्नाच्या 9 वर्षांनंतर दृष्टि- नीरज झाले आई-बाबा
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री द्रष्टी धामी आणि नीरज खेमका लग्नाच्या 9 वर्षांनंतर आई बाबा झाले आहेत. द्रष्टीने मंगळवारी 22 ऑक्टोबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. याबाबत अभिनेत्रीने सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत तिच्या चाहत्यांसोबत ही आनंदची बातमी शेअर केली आहे. सोशल मीडियावर द्रष्टी धामी आणि नीरज खेमकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्रीची गरोदरपणाच्या 10 व्या महिन्यात प्रसूती झाली आहे.
हेदेखील वाचा- ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘वनवास’, नाना पाटेकरांसोबत दिसणार उत्कर्ष शर्मा
द्रष्टीने आई झाल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. द्रष्टी धामीच्या पोस्टवर सेलिब्रिटी आणि चाहते अभिनंदन करत आहेत. जेनिफर विंगेट, रुबिना दिलीक, नकुल मेहता, करण ग्रोव्हर, दिशा परमार, आदिती गुप्ता, पूजा गौर, सुमोना चक्रवर्ती, मौनी रॉय, सुरभी ज्योती, किश्वर मर्चंट यांच्यासह अनेक चाहत्यांनीही या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. द्रष्टी अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग आहे. दृष्टीने ‘बिग बॉस 18’ ची स्पर्धक विवियन डिसेनासोबतही काम केलं आहे.
यापूर्वी, द्रष्टी धामीने एक मजेदार पोस्ट शेअर केली होती की 41 आठवडे झाले आहेत आणि बाळ अद्याप जन्माला आलेले नाही. आता तर ती चिडचिडही झाली आहे. याच पोस्टवर राहुल वैद्य यांची पत्नी दिशा यांनी सांगितले की, त्यांच्या बाळाला इतकी घाई होती की ते 37 व्या आठवड्यातच बाहेर आले.
द्रष्टी धामीने वयाच्या 40 व्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दृष्टी धामी आणि तिचा पती नीरज खेमका यांनी सोशल मीडियावर एका सुंदर पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “शेवटी ती आली आहे. 22 ऑक्टोबर 2024. थेट स्वर्गातून आमच्या जीवनासाठी एक गोंडस परी आली. ही एक नवीन सुरुवात आहे.” या मेसेजच्या खाली दृष्टी आणि नीरजसोबत त्यांच्या पालकांची नावे सुमन-प्रकाश खेमका आणि विभूती धामी लिहिली आहेत.
हेदेखील वाचा- इशा अंबानी ठरली ‘आयकॉन ऑफ द इयर अवॉर्ड’ची मानकरी! स्टाईल स्टेटमेंटने जिंकली सर्वांची मनं
द्रष्टी धामी आणि नीरज खेमका यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आई बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी शेअर केली होती. द्रष्टी आणि नीरज यांचे 2015 मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या 9 वर्षानंतर त्यांनी बाळाचे प्लॅनिंग केले. एका टीव्ही सीरियलच्या प्रमोशनदरम्यान, माध्यमांशी बोलताना अभिनेत्रीला आई होण्याबद्दल विचारलं असता ती म्हणाली होती की, तिला आई बनण्याची घाई नाही आणि तिच्यावर कुटुंबाचा कोणताही दबाव नाही. जेव्हा नीरज आणि ती तयार होतील तेव्हा ते बाळाची प्लॅनिंग करतील.
वयाच्या 22 व्या वर्षी दृष्टीने करण सिंग ग्रोवरच्या ‘दिल मिल गए’ या मालिकेतून करिअरला सुरुवात केली. तिने गुरमीत चौधरीसोबत ‘गीत हुई सबसे पराई’ या रोमँटिक टीव्ही शोमध्ये काम केले, ज्याने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड तोडले. गुरमीतसोबत तिची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. या शोनंतर द्रष्टी स्टारमधून कलर्स टीव्हीकडे वळली. या शोमध्ये तिने विवियन दसनासोबत ‘मधुबाला- एक इश्क एक जुनून’ नावाचा सुपरहिट टीव्ही शो केला. विवियन डिसेना सध्या ‘बिग बॉस 18’ च्या घरात एक स्पर्धक आहे.
द्रष्टी तिच्या गरोदरपणात सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. गरोदरपणात तिने केलेले वर्कआउट, तिचा डान्स आणि मित्र नकुल मेहतासोबतचे तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. मात्र, त्या व्हिडिओंच्या खाली द्रष्टीने एक डिस्क्लेमर दिला होता की, ती गरोदरपणात जी काही ॲक्टिव्हिटी करत आहे, ती सर्व काही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करत आहे.