कोल्हापुरातील कॉंग्रेसच्या विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यात सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. अशातच महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला असून, यात काँग्रेसचा वरचष्मा असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस 105 जागा, शिवसेना (ठाकरे गट) 98 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 85 जागा लढवणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत ‘न भूतो न भविष्यति’ अशी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. 2019 च्या निवडणुकीत एकामेकांविरोधात लढलेले पक्ष आता एकमेकांबरोबर आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाने एकत्रितपणे निवडणूक लढविली होती. त्यांच्याविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. मात्र, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सहभागी झाला आहे. तर, भाजपबरोबर शिवसेना (शिंदे गट) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत 99 उमेदवार
महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपा 162, शिवसेना (शिंदे गट) 72 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 54 अशाप्रकारे महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागा लढवणार आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतही 99 उमेदवारांच्या नावांचा समावेश होता, यावरुन महायुतीने 9 या आकड्याला प्राधान्य दिल्याचे मानले जात आहे.
ठाकरे गटाच्या शिवसेनेची भूमिका आग्रही
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अधिक यश मिळाले. राज्यातील 48 जागांपैकी 31 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. त्यातही काँग्रेसने सर्वाधिक 13 जागांवर विजय मिळविला. परिणामी, विधानसभेच्या जागावाटपात काँग्रेसचे वर्चस्व राहणार, हे निश्चित होते.