Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैचारिक लढा सुरूच राहील, मी किंचितही मागे हटणार नाही; विकास लवांडे यांचा निर्धार

आपण कोणत्याही व्यक्तीच्या जाती-धर्माच्या विरोधात नाही. हा पूर्णपणे वैचारिक लढा आहे आणि तो शेवटपर्यंत सुरू राहील, असं विकास लवांडे यांनी म्हटले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 01, 2026 | 04:04 PM
वैचारिक लढा सुरूच राहील, मी किंचितही मागे हटणार नाही; विकास लवांडे यांचा निर्धार

वैचारिक लढा सुरूच राहील, मी किंचितही मागे हटणार नाही; विकास लवांडे यांचा निर्धार

Follow Us
Follow Us:

इंदापूर : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जो त्याचे प्राशन करतो तो घुरघुरल्याशिवाय राहत नाही. याच विचारांचा आधार घेत मी सामाजिक आणि वैचारिक प्रश्न उपस्थित केले, त्यामुळेच माझ्यावर नियोजित पद्धतीने हल्ला झाला,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला. मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाला गुरुवारी (दि.२८) दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. “आपण कोणत्याही व्यक्तीच्या जाती-धर्माच्या विरोधात नाही. हा पूर्णपणे वैचारिक लढा आहे आणि तो शेवटपर्यंत सुरू राहील. कितीही प्रकार माझ्यासोबत घडले तरी मी किंचितही मागे हटणार नाही,” असा निर्धार लवांडे यांनी
व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, “मी अनेक सामाजिक, वैचारिक प्रश्न माध्यमांतून आणि सोशल मीडियावर मांडले आहेत, मात्र त्यावर उत्तर देण्याऐवजी माझ्याविरोधात खोटी फिर्याद दाखल करण्यात आली. वारकरी परिषदेत मला मिळालेल्या समर्थनानंतरच माझ्यावर आरोपांची मालिका सुरू झाली आणि त्यानंतर नियोजित कार्यक्रमानंतर हल्ला झाला,” असा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी समाजातील वाढत्या विभाजनाबाबत चिंता व्यक्त केली. “आज समाजात माणूस माणसात राहिलेला नाही, असे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत प्रश्न विचारणे आणि सत्य मांडणे हेच माझे काम आहे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही विविध मुद्द्यांवर सरकारवर टीका केली. तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील म्हणाले की, “२०१४ पासून देशात धर्माच्या नावावर वेगवेगळे प्रकार सुरू आहेत. समाजात जागृती करणाऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न होत असून, तो वेळीच थांबवला नाही तर भविष्य अंधकारमय होईल.”

पक्षाचे प्रशिक्षण विभाग राज्य प्रमुख ॲड. राहुल मखरे यांनी आरोप केला की, “महापुरुषांच्या विचारांवर काम करणाऱ्यांवर हल्ले करून त्याचे व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत. समाजात भीती निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. अन्याय करणाऱ्यांऐवजी अन्याय झालेल्यांवरच गुन्हे दाखल केले जात आहेत.”

हे सुद्धा वाचा : पुणे विधानपरिषद उमेदवारीवरून मोठा गोंधळ, विक्रम काकडेंना मिळाली उमेदवारी तर सुनील टिंगरेंची बंडखोरी

कार्यक्रमास पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, शहराध्यक्ष ॲड. ईनायतअली काझी, अक्षय कोकाटे, संजय कांबळे, नितीन देशमाने, डॉ. रियाज पठाण, निहाल पठाण, आय्याज शेख, सुरज धाईंजे, अक्षय मखरे, रोहित मखरे, आझाद सय्यद, नागेश भोसले, अल्ताफ मोमीन, अभिजित चव्हाण, अजय पारसे यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विकास लवांडे यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Vikas lawande spokesperson for sharad pawars ncp has expressed his determination

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • MP Sharad pawar
  • NCP News
  • Vikas Lawande

संबंधित बातम्या

राज्य सरकारचा मोठा निर्णय! २२ जुलै रोजी अजितदादांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होणार; सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक जारी
1

राज्य सरकारचा मोठा निर्णय! २२ जुलै रोजी अजितदादांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होणार; सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.