Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तटकरे खोटे आणि कपटी माणूस’, अजितदादांच्या निधनानंतर आमदारांना फोन केले? महेंद्र थोरवेंच्या दाव्याने राजकारणात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा तापलं आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर आमदारांना फोन केल्यापासून ते उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखात्याच्या चर्चेपर्यंत अनेक दावे थोरवेंनी केले आहेत.

  • By विवेक
Updated On: Nov 07, 2026 | 06:04 PM
Sunil tatkare Mahendra Thorve

Sunil tatkare Mahendra Thorve

Follow Us
Follow Us:
  • सुनील तटकरेंवर महेंद्र थोरवेंचा हल्लाबोल
  • अजित पवारांच्या निधनानंतर आमदारांना फोन केल्याचा आरोप
  • अजितदादांच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरून नवा वाद
 

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खासदार सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या विलीनीकरणाबाबत केलेल्या विधानानंतर आता शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तटकरेंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत थोरवेंनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.

कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरून सुनील तटकरे यांना थेट सवाल केला आहे. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासाठी तब्बल 13 बैठका झाल्या होत्या, असा दावा थोरवे यांनी केला. मग अजितदादांचे विश्वासू सहकारी असल्याचं सांगणारे सुनील तटकरे या बैठकांमध्ये का सहभागी नव्हते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तटकरे यांच्या सध्याच्या विधानांमध्ये आणि आधीच्या भूमिकेमध्ये विसंगती असल्याचा आरोपही थोरवेंनी केला.

Hasan Mushrif ED Case : 2700 पानांची तक्रार कुठे गेली? हसन मुश्रीफ प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपला घेरलं

अजितदादांच्या निधनानंतर आमदारांना फोन?

थोरवे यांनी अजित पवारांच्या निधनानंतरच्या राजकीय घडामोडींबाबतही मोठा दावा केला आहे. अजितदादांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करून आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला.

तटकरेंना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखातं हवं होतं. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या राजकीय भूमिकेमुळे त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही, असा दावा थोरवेंनी केला. या आरोपांबाबत तटकरेंची प्रतिक्रिया समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमकं काय म्हणाले होते सुनील तटकरे?

6 नोव्हेंबर रोजी सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाचं विधान केलं होतं. अजित पवार हयात असते तर 12 फेब्रुवारीला दोन्ही पक्षांचं विलीनीकरण झालं असतं, असं त्यांनी सांगितलं. अजितदादांनी आपल्याला विलीनीकरणाच्या प्रक्रियेची माहिती दिली होती, असाही त्यांचा दावा होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर ही प्रक्रिया थांबल्याचं तटकरे म्हणाले. सध्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीतील वाद आणखी वाढणार?

तटकरेंच्या या विधानावरून आता महेंद्र थोरवेंनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. एकीकडे विलीनीकरणाच्या चर्चा झाल्याचा दावा, तर दुसरीकडे त्यावेळी नेमकं कोणाला माहिती होतं, यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Gokul Politics : अलिबाग नाही, थेट उदयपूर! महायुतीचे १२ संचालक आहेत कुठे? सतेज पाटलांनी सगळंच सांगितलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर काय आरोप केले?

    Ans: सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करून आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला. तसेच उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखातं मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा दावाही केला.

  • Que: अजित पवारांच्या राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत सुनील तटकरे काय म्हणाले?

    Ans: अजित पवार हयात असते तर 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं विलीनीकरण झालं असतं, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं होतं. त्यांच्या निधनानंतर ही प्रक्रिया थांबल्याचंही त्यांनी म्हटलं.

  • Que: महेंद्र थोरवे यांनी विलीनीकरणाच्या किती बैठकांचा उल्लेख केला?

    Ans: अजित पवार हयात असताना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी 13 बैठका झाल्याचा दावा महेंद्र थोरवे यांनी केला. या बैठकांमध्ये सुनील तटकरे का नव्हते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Mahendra thorve sunil tatkare ajit pawar ncp merger controversy vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Mahendra Thorve
  • NCP News
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

‘…तर मग आमचे पक्ष का फोडले?’; खासदार संजय राऊत यांचा सवाल
1

‘…तर मग आमचे पक्ष का फोडले?’; खासदार संजय राऊत यांचा सवाल

NCP Merger : ‘अजितदादांच्या निधनानंतर खोटं का बोललात?’ राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या विधानावरून रोहित पवारांचा तटकरेंना सवाल
2

NCP Merger : ‘अजितदादांच्या निधनानंतर खोटं का बोललात?’ राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या विधानावरून रोहित पवारांचा तटकरेंना सवाल

NCP Merger : अजितदादा असते तर राष्ट्रवादी एकत्र आली असती! सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट, 12 फेब्रुवारीला काय घडणार होतं?
3

NCP Merger : अजितदादा असते तर राष्ट्रवादी एकत्र आली असती! सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट, 12 फेब्रुवारीला काय घडणार होतं?

आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस
4

आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.