Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार, मृत्यूनंतरही मरणयातना; मावळातील ऑर्डव गावातील विदारक वास्तव

मावळ तालुक्यातील ऑर्डव गावात स्मशानभूमी नसल्यामुळे एका मृत व्यक्तीवर भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. मुसळधार पाऊस सुरू असताना हृदय हेलावून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 16, 2026 | 04:29 PM
भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार, मृत्यूनंतरही मरणयातना; मावळातील ऑर्डव गावातील विदारक वास्तव

भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार, मृत्यूनंतरही मरणयातना; मावळातील ऑर्डव गावातील विदारक वास्तव

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ /सतिश गाडे : मावळ तालुका हा औद्योगिक, शैक्षणिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने राज्यात वेगाने विकसित होत असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग, जुना मुंबई–पुणे महामार्ग, रेल्वे, एमआयडीसी, रिंगरोडसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असताना दुसरीकडे तालुक्यातील काही गावांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

 

मावळ तालुक्यातील ऑर्डव गावात स्मशानभूमी नसल्यामुळे एका मृत व्यक्तीवर भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. मुसळधार पाऊस सुरू असताना नातेवाईक आणि ग्रामस्थ छत्र्यांचा आधार घेत अंत्यविधी पार पाडत असल्याचे हृदय हेलावून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले. पावसामुळे चिता पेटविण्यासही अडचणी निर्माण झाल्या. अशा परिस्थितीत अंत्यसंस्कार करणे हे मृताच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत वेदनादायी ठरले.

भारतात स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे पूर्ण झाली असली तरी ग्रामीण भागातील काही गावांमध्ये स्मशानभूमीसारखी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शासनाच्या विविध योजनांतून गावागावांत विकासकामे होत असताना ऑर्डव गावातील हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात स्मशानभूमीसाठी जागा निश्चित नसल्याने प्रत्येक वेळी उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. विशेषतः पावसाळ्यात मृत्यू झाल्यास चिखल, पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे अंत्यविधी करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनाही अशा वेळी मोठा त्रास सहन करावा लागतो.

गावातील नागरिकांनी अनेकदा संबंधित प्रशासन, ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींकडे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली असल्याचे सांगितले. मात्र अद्यापही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. जागेचा वाद, प्रशासकीय दिरंगाई किंवा अन्य कारणांमुळे गावकऱ्यांना मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मावळ तालुक्यात मोठमोठे विकास प्रकल्प राबविले जात असताना ग्रामीण भागातील अशा मूलभूत प्रश्नांकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. “जिवंतपणी सुविधा मिळाल्या नाहीत, पण निदान मृत्यूनंतर तरी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था असावी,” अशी हळहळ ग्रामस्थांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा : बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची गळफास घेऊन आत्महत्या; व्हिडीओत रविंद्र धंगेकरांचं घेतलं नाव

ऑर्डव गावासाठी तातडीने स्वतंत्र स्मशानभूमी मंजूर करून आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी, अंतर्गत रस्ता, शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत सुविधा आणि अंत्यसंस्कारासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उभाराव्यात, तसेच जागेचा वाद असल्यास तो तातडीने निकाली काढावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी राज्य शासन, जिल्हा प्रशासन, पंचायत समिती आणि संबंधित लोकप्रतिनिधींकडे केली आहे. गावाच्या विकासाबरोबरच नागरिकांच्या सन्मानाचा प्रश्न असलेल्या स्मशानभूमीचा विषय आता तरी मार्गी लागणार का, याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Villagers in aardv village maval taluka have expressed anger over the lack of a cremation ground

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • maval news
  • Sunetra Pawar
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…
1

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…

वराळेत जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर हल्ला, कोयत्याने सपासप वार करुन संपवलं; आठ जणांवर गुन्हा दाखल
2

वराळेत जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर हल्ला, कोयत्याने सपासप वार करुन संपवलं; आठ जणांवर गुन्हा दाखल

मावळच्या एसटी सेवेला ‘जिजाऊ’ची साथ, पाच नव्या स्मार्ट बसेसचे लोकार्पण; आगारातील बसेसची संख्या तब्बल…
3

मावळच्या एसटी सेवेला ‘जिजाऊ’ची साथ, पाच नव्या स्मार्ट बसेसचे लोकार्पण; आगारातील बसेसची संख्या तब्बल…

प्रथम ‘भारतकेसरी’ ओम्या बैलाचे निधन; मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक अन् चाहत्यांकडून हळहळ व्यक्त
4

प्रथम ‘भारतकेसरी’ ओम्या बैलाचे निधन; मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक अन् चाहत्यांकडून हळहळ व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.