Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पक्षात काही अतृप्त आत्मे, त्यांना पक्ष चांगला चाललेलं खूपत नाही,’ सुनेत्रा पवार यांच्यावरील नोटिशीवर राष्ट्रवादीचा पलटवार

सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरील नोटिशीवर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी सविस्तर भूमिका मांडली. निवडणूक आयोगाने अध्यक्षपदाला मान्यता दिल्याने नोटिशीला कोणताही कायदेशीर आधार नसल्याचा दावा त्यांनी केला असून सच्चिदानंद सिंह यांना कोणी फूस लावली का, याचीही चौकशी केली जाणार असल्याचे म्हटले.

  • By विवेक
Updated On: Jul 13, 2026 | 09:50 PM
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल? राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांची पदाधिकाऱ्यांबाबत नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल? राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांची पदाधिकाऱ्यांबाबत नाराजी

Follow Us
Follow Us:
  • सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदावरील नोटिशीला उमेश पाटील यांचा जोरदार प्रतिवाद
  • ‘सच्चिदानंद सिंह यांना कोणी फूस लावली का, शोध घेऊ’ – उमेश पाटील
  • पक्षात कोणताही अंतर्गत वाद नसल्याचा राष्ट्रवादीचा दावा
राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासू मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अश्यातच आता राजकीय वर्तुळातून मोठी घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. या नोटीसमुळे पक्षात आणि राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

झारखंडमधील पक्षाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कायदेशीर नोटीस पाठवल्याचा दावा केला आहे. या घडामोडीनंतर पक्षात चर्चांना उधाण आले असून राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी यावर सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे.

सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह? ज्येष्ठ नेत्याची कायदेशीर नोटीस

“अद्याप पक्षाकडे नोटीस प्राप्त झालेली नाही, नोटिशीतील दाव्यांना कायदेशीर आधार नाही”

उमेश पाटील म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीविरोधात काही माध्यमांमध्ये बातम्या दाखवल्या जात आहेत. मात्र पक्षाच्या घटनेनुसार कोणताही आक्षेप असल्यास तो प्रथम पक्षांतर्गत मांडला पाहिजे. थेट न्यायालय किंवा नोटिशीचा मार्ग स्वीकारणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित नोटीस अद्याप पक्षाकडे प्राप्त झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड गुप्तपणे झाली, हा आरोप त्यांनी फेटाळून लावत वरळी डोम येथे सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याचे सांगितले. तसेच भारत निवडणूक आयोगाने आवश्यक पडताळणी करून त्यांच्या अध्यक्षपदाला मान्यता दिल्यामुळे नोटिशीतील दाव्यांना कोणताही कायदेशीर आधार राहत नसल्याचा दावा त्यांनी केला.

“सच्चिदानंद सिंह कोणी फूस लावली का, याचा शोध घेतला जाईल”

सच्चिदानंद सिंह यांनी पक्षशिस्त मोडल्याचा आरोप करत त्यांच्या प्रत्येक आक्षेपाला कायदेशीर उत्तर दिले जाईल, असेही उमेश पाटील म्हणाले. पक्षात कोणताही अंतर्गत वाद नसून काही अतृप्त लोक प्रसिद्धीसाठी किंवा इतरांच्या सांगण्यावरून अशा प्रकारच्या हालचाली करत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Arvind Sawant: ‘ज्या महिलांनी सत्तेवर आणलं, त्यांचीच नावं…’, लाडकी बहीण योजनेवरून अरविंद सावंत सरकारवर कडाडले

यावेळी त्यांनी सच्चिदानंद सिंह यांचे नाव अनेकांनी प्रथमच ऐकले असे सांगत, त्यांच्या मागे कोणाचा प्रभाव आहे का, त्यांनी स्वतःहून हा निर्णय घेतला का किंवा त्यांना कोणी फूस लावली का, याचाही शोध घेतला जाईल, असा इशारा दिला.ते यावेळी म्हणाले, “पक्षात काही अतृप्त आत्मे आहेत. त्यांना पक्ष चांगला चाललेला खुपत नाही. पक्षाच्या शिस्तपालन समितीसमोर न जाता थेट नोटीस पाठवणे चुकीचे आहे. पवार कुटुंबाला आव्हान देण्याची ताकद महाराष्ट्रात कोणाचीही नाही” असे ते म्हणाले.

उमेश पाटील यांनी पुढे सांगितले की, सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व एकमुखाने स्वीकारलं आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व असेल तरच भविष्यात निवडणुका जिंकू शकतो असा विश्वास सर्व कार्यकर्त्यांचा आहे, असा विश्वास कार्यकर्त्यांना असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही सुनेत्रा पवार यांचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नाव नोंद असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Sunetra pawar national president notice umesh patil reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 09:50 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Maharashtra Politics
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला
1

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला

‘अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सोमेश्वरच्या सभासदांनी साथ द्यावी’; सुनेत्रा पवारांचे भावनिक आवाहन
2

‘अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सोमेश्वरच्या सभासदांनी साथ द्यावी’; सुनेत्रा पवारांचे भावनिक आवाहन

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
4

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.