माऊलींचा संजीवन समाधी सोहळा (श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी)
आळंदी: संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 728 वा संजीवन समाधी सोहळा पार पडला. हा सोहळा मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासून अलंकापुरी आळंदीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखों वारकरी दाखल झाले आहेत. ग्यानबा तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली , ज्ञानराज माऊली अशा जयघोषात हा सोहळा पार पडला. मुख्य मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.
सकाळच्या सुमारास ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर कीर्तन सेवा करण्यात आली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या मुख्य मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. लाखों वारकऱ्यांच्या साक्षीने माऊलींचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला. संजीवन समाधी सोहळ्याच्या वेळेस वारकरी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
समाधी सोहळ्यानिमित्त माऊली मंदिरात आकर्षक रांगोळी, फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. कार्तिकी वारीत काळात अभिषेक, आरती, नैवेद्य असे नित्योपचार वगळता २४ तास दर्शन खुले ठेवण्यात आले होते. तसेच लाखो भाविकांनी महाद्वारातून मुख दर्शन घेतले. समाधी सोहळ्यानिमित्त मंदिरावर विमानातून पुष्पवृष्टी करण्यात आली. या सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल होत असतात. यंदादेखील मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. इंद्रायणी नदीत वारकरी स्नान करून माऊलींचे दर्शन घेतात. संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आळंदी कार्तिकी यात्रा अंतर्गत उत्पत्ती एकादशी निमित्त श्री मळाईदेवी पंचक्रोशीतून आलेल्या हजारो भाविकांनी हरिनामाचा गरज करत कार्तिकी एकादशी परंपरेने आळंदीत ग्राम प्रदक्षिणी, इंद्रायणी स्नान, टाळ, मृदंग, विणीचा त्रिनाद करीत साजरी करण्यात आली.
कसा साजरा होतो संजीवन समाधी सोहळा?
अलंकापुरी आळंदी येथे लाखो भाविक संजीवन समाधी सोहळ्यासाठी दाखल होत असतात. या सोहळ्याची सुरुवात 23 नोव्हेंबरपासूनच होते. संजीवन समाधी सोहळ्याची सुरुवात मंदिराच्या समोर महाद्वारावर असलेल्या हैबतबाबा यांच्या पूजनाने होते. संजीवन समाधी सोहळ्यासाठी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथून पांडूरंगाची पालखी काही दिवस आधीच आळंदीकडे मार्गस्थ होत असते. संजीवन समाधी सोहाळ साजरा करण्यात येत असलेल्या कालावधीत माऊलींच्या संजीवन समाधीसमोर दररोज अभिषेक, दुग्धारती, महापूजा, भजन, कीर्तन, पारायण केले जाते.
मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतले दर्शन
संत ज्ञानेश्वर महाराज 728 वा संजीवन समाधी व कार्तिकी यात्रा 2024 निमित्ताने आज सकाळी भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. देवस्थानतर्फे विश्वस्त भावार्थ देखणे यांनी शाल,हार , श्रीफळ देऊन आमदार चंद्रकांत पाटील यांचा सन्मान केला.यावेळी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,भाजप पदाधिकारी संजय घुंडरे व संकेत वाघमारे उपस्थित होते.