Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Warli Art Design : पुणे SNDT च्या विद्यार्थीनीची कमाल! सई राऊतच्या वारली पेंटिगला भारत सरकारकडून पेटंट

Warli Art Design : SNDT महिला विद्यापीठाच्या पुण्यातील गृहविज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थीनी सई राऊत हिने साकारलेल्या वारली पेटिंगला भारत सरकारकडून पेटंट मिळाले आहे. विद्यार्थींच्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 20, 2026 | 04:20 PM
Sai Raut Warli Art Design Patent

Sai Raut Warli Art Design Patent

Follow Us
Follow Us:
  • पुणे SNDT च्या विद्यार्थीनीची कमाल
  • सई राऊतच्या वारली पेंटिगला भारत सरकारकडून पेटंट
Warli Art Design : पुणे : एसएनडीटी महिला विद्यापीठच्या पुणे आवारातील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सई राजेंद्र राऊत हिला तिच्या वारली कला आधारित कलाकृतीसाठी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत डिझाईन पेटंट प्राप्त झाले आहे. या यशामुळे विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेला आणि बौद्धिक संपदा हक्कांविषयीच्या जाणीवेला नवे बळ मिळाले आहे.

हे देखील वाचा :APJ Abdul Kalam : भारतरत्न कलामांचा अनोखा खजिना पुण्यात; ‘या’ ठिकाणी आहे ५०० दुर्मीळ फोटोंचा संग्रह

महाविद्यालयामध्ये दरवर्षी विविध प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. या प्रदर्शनांद्वारे विद्यार्थिनींना त्यांच्या नवकल्पना, डिझाईन्स आणि कलाकृती सादर करण्याची संधी दिली जाते. तसेच, या कलाकृतींना बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण मिळवून देण्यासाठी महाविद्यालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

सई राऊत हिने साकारलेल्या वारली कला डिझाईनला भारत सरकारच्या ‘द पेटंट ऑफिस’कडून अधिकृत डिझाईन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. विद्यार्थिनींमध्ये नवसंशोधन, डिझाईन संरक्षण आणि बौद्धिक संपदा हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयात सकारात्मक वातावरण तयार करण्यात आले आहे.

या यशाबद्दल विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव यांनी सई राऊत हिचे अभिनंदन करत तिच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांनी विद्यार्थिनींच्या कल्पकतेला बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण मिळवून देण्यासाठी महाविद्यालय सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी विकास देसाई, उपकुलसचिव राकेश वळवी, पुणे आवार प्रमुख डॉ. शितल मोरे, डॉ. शिल्पा हत्तींगडी, डॉ. भरत व्यंकटे तसेच प्रा. नगराळे यांनीही कु. सई राऊत हिचे अभिनंदन केले. डिझाईन पेटंट मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डॉ. अमर ढेरे आणि तत्कालीन प्राचार्य डॉ. सचिन देवरे यांनी विद्यार्थिनीला मार्गदर्शन आणि सहकार्य केले.

१८ बौद्धिक संपदा प्रमाणपत्रे प्राप्त

मागील शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाने एकूण १८ बौद्धिक संपदा प्रमाणपत्रे प्राप्त केली असून, या यशामुळे विद्यार्थिनींमध्ये संशोधन, नवकल्पना आणि बौद्धिक संपदा हक्कांविषयी नवचेतना निर्माण झाली आहे. भविष्यात अशा अधिक सर्जनशील उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ

Web Title: Warli art design sai raut patent sndt pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Marathi News
  • pune news
  • SNDT

संबंधित बातम्या

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात
1

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम
2

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा
3

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा

‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद
4

‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.