Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ (फोटो सौजन्य: एआय)
राज्य शासनाकडून उल्लेखनीय तसेच सामाजिक कार्यालयात मोलाची कामगिरी करणाऱ्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते.अशा पुरस्कार विजेत्यांना शासनाकडून शासकीय योजनांचा लाभ दिला जातो. त्याप्रमाणेच (एसटी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडाळाच्या प्रवास १०० टक्के सवलत दिली जात आहे. त्याचा लाभा पुणे विभागातून तब्बल २०१ जणांकडून घेतला जात असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
एमएसआरडीच्या पुणे विभागात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यातील २०१ व्यक्तींना राज्य शासनाकडून महापुरुषांच्या नावाने विविध पुरस्कार दिले गेले आहेत. या पुरस्कार विजेत्यांना विशेष बाब म्हणून महाराष्ट्र शासनाकडून राज्यात कुठेही प्रवास करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या’ (एसटी) बसेसमध्ये दरवर्षी मोफत वार्षिक पास देण्यात आला आहे.
या योजनेच्या माध्यमातून पुरस्कार विजेत्यांना एसटीच्या साध्या आणि निमआराम, शिवनेरी, शिवाई इ.बसेसमधून वर्षभर १००% मोफत प्रवास करता येतो. विशेष म्हणजे, या पुरस्कार विजेत्या व्यक्तीसोबत असणाऱ्या एका सहप्रवाशाला देखील मोफत प्रवासाची सुविधा मिळते.






