Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडज धरणातून 1000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू; मीना नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

वडज धरणाची पाणीपातळी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७१५.६१ मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, धरणातील उपयुक्त पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 08, 2026 | 03:00 PM
वडज धरणातून 1000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू; मीना नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

वडज धरणातून 1000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू; मीना नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Follow Us
Follow Us:

नारायणगाव : कुकडी धरण प्रकल्पातील धरणांपैकी जुन्नर तालुक्यातील वडज धरणातील पाणीसाठा वाढल्याने धरण प्रशासनाने सांडव्यावरून 1000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

वडज धरणाची पाणीपातळी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७१५.६१ मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, धरणातील उपयुक्त पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गात परिस्थितीनुसार वाढ अथवा घट करण्यात येऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मीना नदीकाठच्या सर्व ग्रामपंचायतींना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, संबंधित ग्रामपंचायतींनी आपल्या हद्दीत सायरन वाजवून नागरिकांना सावध करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नदीकाठच्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये

मीना नदी परिसरातील नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीतील पाण्याचे पंप, शेतीसाठी वापरण्यात येणारी अवजारे, साहित्य तसेच जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असेही प्रशासनाने म्हटले आहे. सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी व कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे

नदीकाठच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी व जलसंपदा विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसर पहिल्याच पावसात जलमय

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसरात सुरू मुसळधार पावसाचा फटका आता तेथील नागरिकांना बसत आहे. सोमवारी व मंगळवारी दिवसभर कोसळलेल्या पावसानंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संपूर्ण परिसराला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले.

विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

मंदिराच्या चारही बाजूने पाण्याचा वेढा पडल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. नव्याने उभारण्यात आलेल्या सभा मंडपातही पावसाचे पाणी गळू लागल्याने विकासकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Konkan Rain : रत्नागिरीत दरड दुर्घटनांची मालिका सुरूच; दहिवलीत चार घरे ढिगाऱ्याखाली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Web Title: Water discharge of 1000 cusecs has commenced from vadaj dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Rain News

संबंधित बातम्या

पावसाच्या सरींमध्ये रुजतंय हरित स्वप्न; ‘फॉरेस्ट’चा १० लाख सीडबॉल्सचा संकल्प
1

पावसाच्या सरींमध्ये रुजतंय हरित स्वप्न; ‘फॉरेस्ट’चा १० लाख सीडबॉल्सचा संकल्प

लोणावळा, मावळ अन् खेडमध्ये ‘पीडीआरएफ’ची धाडसी मोहीम, शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले; शोधकार्य सुरूच
2

लोणावळा, मावळ अन् खेडमध्ये ‘पीडीआरएफ’ची धाडसी मोहीम, शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले; शोधकार्य सुरूच

Maharashtra Rain Alert: पुण्यावर आभाळ फाटलं! लोणावळ्यात तब्बल १२९० मिमी…; उद्या हाहाकार
3

Maharashtra Rain Alert: पुण्यावर आभाळ फाटलं! लोणावळ्यात तब्बल १२९० मिमी…; उद्या हाहाकार

Kerala Landslide: केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाचे रौद्ररूप! भीषण भूस्खलनाचा काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर, तर दोघांचा मृत्यू
4

Kerala Landslide: केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाचे रौद्ररूप! भीषण भूस्खलनाचा काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर, तर दोघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.