Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: पुण्यावर आभाळ फाटलं! लोणावळ्यात तब्बल १२९० मिमी…; उद्या हाहाकार

सलग कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. धरणांच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 07, 2026 | 07:24 PM
Maharashtra Rain Alert: पुण्यावर आभाळ फाटलं! लोणावळ्यात तब्बल १२९० मिमी…; उद्या हाहाकार
Follow Us
Follow Us:
  • लोणावळ्यात ४८ तासांत १,२९० मिमी पाऊस
  • घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा कहर
  • उद्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट
Imd Alert For Maharashtra/सुनयना सोनवणे: पुणे शहर, उपनगरांसह जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर मंगळवारीही कायम राहिला. घाट परिसरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाल्याने लोणावळ्यात अवघ्या ४८ तासांत तब्बल १ हजार २९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी गेल्या २४ तासांतच ६२० मिलिमीटर पाऊस कोसळला. दरम्यान, पुणे शहरातील जुलै महिन्यातील एकूण पर्जन्यमान ३०९.१ मिलिमीटरवर पोहोचले असून, २०१४ नंतरच्या काळातील जुलैमधील हा चौथा सर्वाधिक पाऊस ठरला आहे.

हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत पुणे शहर आणि परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते आणि सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळित झाले. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चिंचवड येथे सर्वाधिक २६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. चिंचवडनंतर दापोडी येथे १२५.५, पाषाण येथे ११५.६, शिवाजीनगर येथे ९७.५ आणि एनडीए परिसरात ९५.५ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे पाषाणमध्ये जुलै महिन्यात सलग दोन दिवस १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची ही ऐतिहासिक घटना ठरण्याची शक्यता आहे.

भरलं रे भरलं! पुण्यावर वरुणराजाची अथांग कृपा! Khadakwasla धरणाच्या कालव्यातून थेट…

जुलैतील पावसाचा नव्या विक्रमाकडे प्रवास 
पुणे शहरातील यंदाच्या मान्सून हंगामातील एकूण पाऊस ३०९.१ मिलिमीटरवर पोहोचला आहे. हे संपूर्ण मान्सून हंगामाच्या सरासरीच्या जवळपास ५० टक्के आहे. २०१४ नंतर जुलै महिन्यातील हा चौथा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. यापूर्वी २०१९ मध्ये ३६९.१, २०२२ मध्ये ३८६.२ आणि २०२४ मध्ये ३९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. हवामान विभागाच्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, २०२२ पासून दर एक वर्षाआड पुणे शहरात जुलै महिन्यात ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा कल दिसून येत आहे.

दरडी कोसळण्याचा धोका; प्रशासन सतर्क 
सलग कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. धरणांच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. घाटमाथ्यावर झालेल्या विक्रमी पावसामुळे भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सतर्क केल्या आहेत. नागरिकांनी धरण क्षेत्र, नदीकाठ आणि घाट परिसरात पर्यटनासाठी जाऊ नये तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा कहर सुरू असतानाच लोणावळ्यात सोमवारी अवघ्या २४ तासांत ६७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) आणि केंद्रीय जल आयोगाच्या (सीडब्ल्यूसी) आयएमडी-सीडब्ल्यूसी ॲटलस-२०१५मधील विश्लेषणानुसार हा पाऊस सुमारे हजार वर्षांतून एकदा अनुभवायला मिळणाऱ्या अतिवृष्टीच्या पातळीपेक्षाही अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पश्चिम घाटातील ही नोंद हवामानशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत दुर्मीळ मानली जात आहे. तर दुसरीकडे याच कालावधीत पुणे शहरातील शिवाजीनगर वेधशाळेत १०८.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यात २४ तासांत झालेल्या पावसाचा हा चौथा सर्वाधिक उच्चांक ठरला आहे. यापूर्वी १९५८ मध्ये १३०.४ मिमी, १९६७ मध्ये ११७.९ मिमी आणि २०१४ मध्ये ११४.१ मिमी पावसाची नोंद झाली होती.

ठिकाण – गेल्या २४ तासांतील पाऊस (मिलिमीटरमध्ये)

दावडी – ६८८
लोणावळा – ६२०
ताम्हिणी – ५३०
भिरा – ५१२
डोंगरवाडी – ४२३
शिरगाव – ४२०
वळवण – ३९२
खांडी – ३१२
मुळशी – ३१२
निळशी – ३०७
कुंडली – २७९
कोयना – २४४
खोपोली – २४०
भिवपुरी – २०५
पोफळी – १९२
शिरवटा – १८०

महाभयंकर संकट? Pune शहराला मुसळधार पावसाचा इशारा; सिंहगड किल्ला बंद अन् खडकवासला धरण…

पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी कमाल तापमानात तीन अंश सेल्सिअसची वाढ नोंदवण्यात आली. शहरातील किमान तापमान २२.७ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला, तर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची नोंद झाली. बुधवारी शहरातील कमाल तापमान स्थिर राहण्याची, तर किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान २७ अंश, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून घाट विभागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज कायम आहे. त्यामुळे घाट विभागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Web Title: Imd gave orange alert to pune and maharashtra lonavala heavy rainfall weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • Heavy Rainfall
  • IMD alert of maharashtra
  • Lonavala news
  • Rain News

संबंधित बातम्या

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…
1

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट
2

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट

Rain Update : देशातील 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात…
3

Rain Update : देशातील 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.