Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाच्या सरींमध्ये रुजतंय हरित स्वप्न; ‘फॉरेस्ट’चा १० लाख सीडबॉल्सचा संकल्प

सीडबॉल म्हणजे माती, शेण आणि देशी वृक्षांच्या बियांपासून तयार केलेला छोटासा गोळा. पावसाच्या ओलाव्यात तो विरघळतो आणि आत दडलेले बीज अंकुरते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 08, 2026 | 02:35 AM
पावसाच्या सरींमध्ये रुजतंय हरित स्वप्न; ‘फॉरेस्ट’चा १० लाख सीडबॉल्सचा संकल्प
Follow Us
Follow Us:

पुण्यातील ‘फॉरेस्ट’ या निसर्गप्रेमी संस्थेचा अभिनव उपक्रम
पावसाळा आता केवळ ऋतू न राहता एक हरित मोहिम ठरला
तब्बल १० लाख सीडबॉल्स निसर्गात रुजविण्याचा संकल्प

सुनयना सोनवणे / पुणे: पाऊस सुरू झाला की शहरात कुठे चिखल दिसतो, कुठे वाहतूक मंदावते, पण त्याच पावसात काही जणांसाठी हा काळ जमिनीत स्वप्न पेरण्याचा असतो. हातात मातीचे छोटे गोळे, त्यात लपलेली बीजं आणि डोळ्यांत पुढच्या काही वर्षांची हिरवाई….. पुण्यातील ‘फॉरेस्ट’ या निसर्गप्रेमी संस्थेचा यंदाचा पावसाळा अशाच एका उपक्रमाने व्यापलेला आहे.

‘फ्रेंड्स ऑफ रेपटाइल्स अँड एन्व्हायरमेंटल सेव्हिंग ट्रस्ट’ (फॉरेस्ट) या संस्थेने यंदा तब्बल १० लाख सीडबॉल्स निसर्गात रुजविण्याचा संकल्प केला आहे. झाडे कमी होत असल्याच्या चर्चा, तक्रारी आणि चिंता यांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीचा मार्ग निवडणाऱ्या या उपक्रमामुळे त्यांच्यासाठी पावसाळा आता केवळ ऋतू न राहता एक हरित मोहिम ठरत आहे.

निसर्गसंवर्धन ही केवळ चळवळ नसून ती जीवनशैली व्हावी, या विचारातून विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी एकत्र येत ही संस्था उभी केली आहे. संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक, सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडले गेलेले निसर्गप्रेमी आणि स्थानिक नागरिक हे सगळे मिळून या मोहिमेला आकार देत आहेत. त्यामुळे छोटा वाटणारा हा उपक्रम आता हळूहळू व्यापक जनसहभागाची चळवळ बनतो आहे.

आई शप्पथ! 23% पावसाचे थेंब जमिनीवर पोहोचण्याआधीच…; ‘ IITM ‘च्या संशोधनातून निष्कर्ष

सीडबॉल म्हणजे माती, शेण आणि देशी वृक्षांच्या बियांपासून तयार केलेला छोटासा गोळा. पावसाच्या ओलाव्यात तो विरघळतो आणि आत दडलेले बीज अंकुरते. डोंगराळ भाग, ओसाड माळराने आणि कमी हरित क्षेत्र असलेल्या ठिकाणी ही पद्धत विशेष परिणामकारक ठरते. त्यामुळेच यंदा या उपक्रमाचा आवाका वाढवत मोठ्या प्रमाणावर सीडबॉल्स तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सुमारे १ लाख ६० हजार सीडबॉल्स टाकण्यात आले आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगा, माळराने आणि वनपरिक्षेत्रांमध्ये या बियांचे पडसाद आता हळूहळू दिसू लागले आहेत. सागर कुटे, मनोज शिंदे, सूरज कवडे, कार्तिक माने, चेतन निगडे, अजिंक्य कांबळे, अक्षय कांबळे, प्रतीक महामुनी, बसवराज बनसोडे यांसारख्या स्वयंसेवकांनी श्रमदानातून या मोहिमेला गती दिली. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे हा उपक्रम अधिक संघटित आणि प्रभावी बनत आहे.

देशी बियांची निवड –
या सीडबॉल्समध्ये आंबा, जांभूळ, चिंच, रामफळ, कारंजा, चिकू, भोकर तसेच स्थानिक रानफुलांच्या बियांचा समावेश आहे. काही ठिकाणी वड आणि पिंपळ यांसारख्या दीर्घायुषी वृक्षांच्या बियाही वापरण्यात येत आहेत, जेणेकरून परिसंस्थेला दीर्घकालीन बळ मिळेल.

झाडांच्या मुळाशी करवतीचे घाव! कर्जतच्या ‘या’ गावात नेमकं काय घडतंय? पर्यावरणप्रेमी का संतापले?

नागरिकांच्या सहभागातून उभी राहिलेली चळवळ –
या उपक्रमाची खास ओळख म्हणजे त्यामागचा नागरिकांचा सहभाग. संस्थेचे सदस्य सर्पमित्र म्हणून काम करताना अनेक वेळा रेस्क्यू सेवा मोफत देतात आणि त्याबदल्यात नागरिकांना ‘पैसे नकोत, पण झाडांच्या बिया द्या’ ही एकच विनंती करतात. या साध्या आवाहनाला खानापूर, सिंहगड, पानशेत, वेल्हे, खडकवासला, डोणजे परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. शेतकरी, ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमींनी दिलेल्या बियांच्या दानामुळे हा उपक्रम अधिक व्यापक झाला आहे.

‘आपण आज टाकलेला एक सीडबॉल भविष्यात एखाद्या जंगलाचा पाया ठरू शकतो. या मोहिमेत केवळ सीडबॉल टाकणे एवढेच नाही, तर त्याच्या वाढीवर लक्ष ठेवणे, योग्य ठिकाणांची निवड आणि स्थानिक सहभाग वाढवणे यावरही भर दिला जात आहे. त्यामुळे ही मोहीम केवळ वृक्षारोपण न राहता एक जिवंत पर्यावरण चळवळ बनते आहे.’
-सागर बावळे पाटील, सदस्य, फॉरेस्ट संस्था, पुणे

Web Title: Forest an organization dedicated nature resolved to sow one million seed balls in nature year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • environment
  • Rain News
  • Seeds

संबंधित बातम्या

राजधानी दिल्लीसह उत्तराखंड, केरळमध्येही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…
1

राजधानी दिल्लीसह उत्तराखंड, केरळमध्येही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका
2

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…
3

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’
4

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.