Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओतूर परिसरात विहिरींनी गाठला तळ; उन्हाळ्यामुळे भीषण पाणीटंचाई, टोमॅटो-मिरची पिके संकटात

ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हान, अहिनवेवाडी, पाचघर परिसर हा भाजीपाला उत्पादनासाठी ओळखला जातो. येथे उन्हाळी हंगामात टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, झेंडू, कोथिंबीर व फळभाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 24, 2026 | 01:29 PM
ओतूर परिसरात विहिरींनी गाठला तळ; उन्हाळ्यामुळे भीषण पाणीटंचाई, टोमॅटो-मिरची पिके संकटात

ओतूर परिसरात विहिरींनी गाठला तळ; उन्हाळ्यामुळे भीषण पाणीटंचाई, टोमॅटो-मिरची पिके संकटात

Follow Us
Follow Us:

ओतूर : ओतूर आणि पंचक्रोशीतील परिसरात यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेकडो फूट खोल गेलेल्या बोअरवेल आणि विहिरींनी तळ गाठल्याने भाजीपाला पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. ऐन हंगामात लाखो रुपये खर्च करून लागवड केलेल्या टोमॅटो, मिरचीसह विविध भाजीपाला पिकांना पाण्याअभावी करपण्याची वेळ आली आहे. शेतकरी आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडले आहेत.

ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हान, अहिनवेवाडी, पाचघर परिसर हा भाजीपाला उत्पादनासाठी ओळखला जातो. येथे उन्हाळी हंगामात टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, झेंडू, कोथिंबीर व फळभाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यंदाही शेतकऱ्यांनी कर्ज काढून आणि उसनवारी करून पिकांची लागवड केली. मात्र, एप्रिल-मेपासून तापमानाचा पारा सातत्याने चाळिशीपार गेल्याने जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने घसरली. परिणामी, परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या असून, अनेक बोअरवेलने पाणी देणे बंद केले आहे.

काही ठिकाणी बोअरवेलमधून अवघा अर्धा ते एक तासच पाणी मिळत असल्याने पिकांना पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे टोमॅटो आणि मिरची पिकांची पाने कोमेजत असून, फुलगळ वाढली आहे. लागलेली फळेही डागाळण्यास सुरुवात झाली आहे.

पाणीटंचाईमुळे उत्पादन घटण्याची भीती

पिके वाचवण्यासाठी अनेक शेतकरी रात्री-अपरात्री वीज उपलब्ध होताच विहिरीवर धाव घेत आहेत. मात्र, विहिरींमध्ये पाणी नसल्याने वीज असूनही उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. काही शेतकऱ्यांनी उभी पिके वाचवण्यासाठी खासगी टँकरचा आधार घेतला असला, तरी हजारो रुपयांचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी पिके उपटून टाकण्याची वेळ आली आहे.

बियाणे, खते, औषध फवारणी आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे शेतीचा उत्पादन खर्च आधीच वाढला असताना पाणीटंचाईमुळे उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. बाजारात भाजीपाल्याला चांगला दर मिळत असला, तरी पिकेच हातची जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण

दरम्यान, चिल्हेवाडी धरण आणि मांडवी नदी परिसरात असूनही ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हान, अहिनवेवाडी व पाचघर भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. बाधित पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी तसेच शेतीसाठी दिवसा सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.कडक उन्हाळ्याने यंदा ओतूर परिसरातील शेतकऱ्यांची कठीण परीक्षा घेतली असून, आता वरुणराजा कधी बरसणार याकडे बळीराजाचे डोळे लागले आहेत.

“एकरी लाखो रुपये खर्च करून टोमॅटो व मिरचीची लागवड केली. सध्या पिके तोडणीच्या टप्प्यात असताना पाण्याअभावी झाडे डोळ्यांसमोर जळताना पाहावी लागत आहेत.

– शेखर डुंबरे, प्रगतशील शेतकरी, ओतूर

Web Title: Wells in the otur region have hit rock bottom severe water scarcity due to the summer heat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • summer heat
  • Water Issue
  • Water supply

संबंधित बातम्या

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
1

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
2

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट
3

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
4

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.