Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: अमृत जलपुरवठा योजनेचे ४४ टक्के काम पूर्ण! ९८५.२६ कोटींच्या प्रकल्पाला पावसामुळे ब्रेक; दिवाळीनंतर येणार वेग

भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत राबविण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत सुमारे ९८५.२६ कोटी रुपये खर्च करून प्रकल्प राबिवण्यात येत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 21, 2026 | 03:30 PM
अमृत जलपुरवठा योजनेचे ४४ टक्के काम पूर्ण! ९८५.२६ कोटींच्या प्रकल्पाला पावसामुळे ब्रेक; दिवाळीनंतर येणार वेग

अमृत जलपुरवठा योजनेचे ४४ टक्के काम पूर्ण! ९८५.२६ कोटींच्या प्रकल्पाला पावसामुळे ब्रेक; दिवाळीनंतर येणार वेग

Follow Us
Follow Us:

अमरावती शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विस्तारित जलपुरवठा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत ४४ टक्के काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुमारे ९८५.२६ कोटी रुपये खर्चुन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र, सध्या पावसाळ्यामुळे कामाच्या गतीवर परिणाम झाला असून, पावसाळा संपल्यानंतर दिवाळीनंतर पुन्हा कामाला वेग दिला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या योजनेअंतर्गत तपोवन येथून प्रस्तावित नवीन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ९ किलोमीटर लांबीची मुख्य ग्रॅव्हिटी पाइपलाइन टाकण्यात येत आहे.(फोटो सौजन्य – AI)

Amravati News: बनावट कृषी निविष्ठांवर घाव! २३० परवाने रद्द; अमरावती विभागात ५२० कृषी केंद्रांची विक्री बंद

जलशुद्धीकरण केंद्रापासून शहरातील विविध जलकुंभांपर्यंत ३२.६३ किलोमीटर लांबीची पाइपलाइन प्रस्तावित असून, त्यापैकी ८ किलोमीटरहून अधिक काम पूर्ण झाले आहे. याशिवाय शहरातील विविध भागांमध्ये २० किलोमीटर नवीन वितरण पाइपलाइन टाकण्यात येणार असून, हे काम लवकरच सुरू होणार आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, हा प्रकल्प सन २०५५ पर्यंतच्या अंदाजित १४.५१ लाख लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराची जलपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि कार्यक्षम होणार आहे.

पावसामुळे गती मंदावली:

सध्या पावसाळ्यामुळे विस्तारित जलपुरवठा प्रकल्पाच्या कामावर काहीसा परिणाम झाला आहे. मात्र, पावसाळा संपताच आणि दिवाळीनंतर प्रकल्पाची सर्व कामे पुन्हा वेगाने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराची जलपुरवठा व्यवस्था अधिक आधुनिक, सक्षम आणि कार्यक्षम होणार आहे.

या प्रकल्पांतर्गत महादेवखोरी येथे ७० एमएलडी क्षमतेचे तिसरे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. तसेच शहरातील विविध भागांत १० लाख लिटर क्षमतेचे व १५ मीटर उंचीचे १५ नवीन जलकुंभ उभारले जाणार आहेत. त्यापैकी ८ जलकुंभांचे बांधकाम सुरू झाले आहे. सध्या बडनेरा येथील जनक रेसिडेन्सी, राजापेठमधील श्रद्धा नगर, रेल्वे लाईन परिसरातील श्याम विहार, बडनेरा रोडवरील अनंतवाडी, जमील कॉलनी, नवसारी पॉवर स्टेशन आणि रहाटगाव येथे जलकुंभ उभारणीची कामे सुरू आहेत.

Uddhav Thackeray Yavatmal: माझ्या सांगण्यावरून तुम्ही ‘त्या’ बुजगावण्याला निवडून दिलं’; उद्धव ठाकरेंनी मागितली मतदारांची माफी

स्मार्ट वॉटर सिस्टीमशी जोडली जाणार 66 सपूर्ण व्यवस्था प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सपूर्ण जलवितरण व्यवस्था ऑटोमेशनवर आधारित स्मार्ट वॉटर सिस्टीमशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे जलपुरवठ्याचे नियंत्रण, देखरेख आणि व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. मात्र, या स्मार्ट प्रणालीच्या अंमलबजावणीचे काम अद्याप सुरू झालेले नाही, अशी माहिती संजय लेवरकर, उपविभागीय अभियंता यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Amravati amrut water supply scheme reaches 44 percent completion work to pick up after diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • amravati
  • Drinking Water
  • Water supply

संबंधित बातम्या

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या
1

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या

GulfTension : आखातात पेटले पाणी युद्ध , जगाची चिंता वाढली
2

GulfTension : आखातात पेटले पाणी युद्ध , जगाची चिंता वाढली

Amravati News: बनावट कृषी निविष्ठांवर घाव! २३० परवाने रद्द; अमरावती विभागात ५२० कृषी केंद्रांची विक्री बंद
3

Amravati News: बनावट कृषी निविष्ठांवर घाव! २३० परवाने रद्द; अमरावती विभागात ५२० कृषी केंद्रांची विक्री बंद

Crime: अमरावतीत ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळलं; पैशाच्या वादातून हत्या, पंजाबचा आरोपी जळगावातून अटकेत
4

Crime: अमरावतीत ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळलं; पैशाच्या वादातून हत्या, पंजाबचा आरोपी जळगावातून अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.