Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : नवी मुंबईत ‘सांडपाणी प्रक्रिया’ धोरणाला हरताळ; पालिकेचा पुन्हा बोरवेलवरच भर?

नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले असतानाही, आता नव्याने बोरवेलसाठी निविदा काढल्याने प्रशासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्याने व सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध असताना भूगर्भातील पाण्याचा वापर करण्याचा अट्टाहास का?

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 16, 2026 | 11:28 AM
नवी मुंबईत 'सांडपाणी प्रक्रिया' धोरणाला हरताळ; पालिकेचा पुन्हा बोरवेलवरच भर? (फोटो सौजन्य-ChatGPT)

नवी मुंबईत 'सांडपाणी प्रक्रिया' धोरणाला हरताळ; पालिकेचा पुन्हा बोरवेलवरच भर? (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबईत ‘सांडपाणी प्रक्रिया’ धोरणाला हरताळ
  • पालिकेचा पुन्हा बोरवेलवरच भर?
  • पाणी असताना बोरवेलचा अट्टाहास का?
सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरात २४ तास पाणीपुरवठा व जलसंधारणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना, आता पुन्हा एकदा महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात आधीच प्रक्रिया केलेले पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना, महापालिकेने बोरवेलसाठी नवीन निविदा काढल्याची माहिती मिळत आहे.

प्रक्रिया केलेले पाणी असताना बोरवेलचा अट्टाहास का? नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर वाढवण्यासाठी विशेष धोरण आखले होते. उद्याने आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी या पाण्याचा वापर करणे बंधनकारक असतानाही, प्रशासनाचे अधिकारी मात्र आता बोरवेल काढण्याकडे अधिक कल दाखवत आहेत. एका बाजूला प्रक्रिया केलेल्या पाण्याची क्षमता वाढवली जात असताना दुसऱ्या बाजूला भूगर्भातील पाणी उपसण्यासाठी बोरवेलला प्राधान्य दिले जात आहे.

Navi Mumbai: प्रकल्पग्रस्तांची घरे आणि सिडको घरे फ्री होल्ड करावीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मंदा म्हात्रेंची मागणी

जर हे टेंडर केवळ सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दुरुस्ती किंवा पाणीपुरवठ्यासाठी असेल, तरीही तिथे प्रक्रिया केलेल्या पाण्याची वाहिनी का जोडली जात नाही? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जिथे प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध आहे, तिथे भूगर्भातील पाण्याचा उपसा टाळणे बंधनकारक आहे. असे असतानाही महापालिका प्रशासनाकडून अशा निविदा काढून पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत का?

शहरात मोठ्या प्रमाणात बोरवेल घेतल्यामुळे भविष्यात भूजल पातळी खालावण्याचा धोका निर्माण झाला आहे. नव्याने काढण्यात आलेल्या या निविदा प्रक्रियेमुळे पालिकेचे नेमके धोरण काय आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे स्मार्ट सिटीच्या नावाखाली पाण्याचा पुनर्वापर करण्याचे दावे केले जातात, तर दुसरीकडे प्रत्यक्ष अंमलबजावणीत बोरवेलचा मार्ग निवडला जात आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्यासाठी पालिकेने गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जर बोरवेलच काढायचे असतील, तर या महागड्या प्रकल्पांचा उपयोग काय? करदात्यांच्या पैशातून उभारलेली ही यंत्रणा केवळ शोभेची वस्तू बनवून ठेवण्याचा प्रकार सुरू आहे का? असा प्रश्न उभा ठाकला आहे.

Kopar Khairane Slab Collapse: नवी मुंबईत मोठी दुर्घटना! कोपरखैरणेत ३० वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; २ वर्षांपूर्वीच…

Web Title: Nmmc borewell tender treated water controversy navi mumbai news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Water Issue
  • Water supply

संबंधित बातम्या

Navi Mumbai News : खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेटमध्ये फेरफार; 75 लाखांचा माल जप्त, दोन आरोपींसह 11 कंपन्यांवर कारवाई
1

Navi Mumbai News : खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेटमध्ये फेरफार; 75 लाखांचा माल जप्त, दोन आरोपींसह 11 कंपन्यांवर कारवाई

Latur News: पाणीटंचाईवर प्रशासन सतर्क! पाझर तलाव, बंधाऱ्यांच्या नियमित पाहणीसाठी विशेष पथकांची नियुक्ती
2

Latur News: पाणीटंचाईवर प्रशासन सतर्क! पाझर तलाव, बंधाऱ्यांच्या नियमित पाहणीसाठी विशेष पथकांची नियुक्ती

पाणीपुरवठा योजना बंद केल्याने ठेकेदार त्रस्त! कोट्यवधींचा निधी प्राप्त; शासनाकडून निधी असूनही देयके नाहीत
3

पाणीपुरवठा योजना बंद केल्याने ठेकेदार त्रस्त! कोट्यवधींचा निधी प्राप्त; शासनाकडून निधी असूनही देयके नाहीत

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल
4

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.