Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport Land Acquisition: ४५० एकर जमिनीचा संमती करार पूर्ण; जिल्हाधिकाऱ्यांच्या वेगवान हालचाली

मागील दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी शेतकऱ्यांना एकरी किती भाव देणार हे जाहीर केले. त्यानंतर लगेचच भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात केली.

  • By anuradha sagar
Updated On: May 06, 2026 | 05:00 PM
Purandar Airport, Land Acquisition, Jitendra Dudi, Pune News, Farmer Protest,

Purandar Airport, Land Acquisition, Jitendra Dudi, Pune News, Farmer Protest,

Follow Us
Follow Us:
  • एकूण ३००० एकर (१२८५ हेक्टर) जमिनीचे संपादन होणार आहे
  • पहिल्या टप्प्यात ४५० एकर जमिनीचा संमती करार पूर्ण झाला आहे
  • ७ मे ते १० जून या काळात संमतीने भूसंपादन होईल, त्यानंतर १० जूनपासून सक्तीने भूसंपादन सुरू करण्यात येईल
Purandar Airport Land Acquisition:  सासवड ( वा ) पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ भूसंपादन बरोबरच शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया वेगात सुरु आहे. केवळ दोनच दिवसात शेकडो एकर जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या संमती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. मात्र एकीकडे काही शेतकरी भूसंपादन आणि मोबदला साठी संमती देत असतानाच दुसऱ्या बाजूला स्थानिक शेतकरी अद्यापही आपला विरोध जाहीर करीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत संमती देणार नाही अशी ठोस भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी अशा सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे. त्यासाठी १२८५ हेक्टर म्हणजे तीन हजार एकर क्षेत्रावर विमान तळ प्रकल्प उभारण्याचे निश्चित करून पहिल्या टप्प्यात ३००० एकर क्षेत्र संपादित करण्याचे जाहीर करून तेवढ्या क्षेत्राची प्रत्यक्षात मोजणी करण्यात आली आहे.

Eknath Shinde Shivsena News: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बडा नेता साथ सोडण्याच्या तयारीत

मागील दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी शेतकऱ्यांना एकरी किती भाव देणार हे जाहीर केले. त्यानंतर लगेचच भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात केली. त्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल ४५० एकर जमिनीचे भूसंपादन झाले. ७ मे पासून १० जून पर्यंत संमती करारनामा तर १० जून नंतर सक्तीने भूसंपादन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी दुडी यांनी जाहीर केले आहे. त्यादृष्टीने शासनाकडून अत्यंत वेगाने प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

संमती देण्यासाठी गुंतवणूकदार यांचीच गर्दी

विमानतळ जागेचे भूसंपादन होत असताना शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रांगा लावल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक पाहता प्रत्यक्षात ज्या गुंतवणूकदारांनी जमिनी काही लाखात खरेदी केलेले गुंतवणूकदार आता कोट्यावधी रुपयांच्या लालसेने रांगा लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ गुंतवणूकदार शेतकऱ्यांच्या पुढाकारानेच भूसंपादन प्रक्रिया अत्यंत वेगात सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

New rules: आता वीज महागणार? नियमांचे उल्लंघन केल्यास भरावा लागणार मोठा दंड

स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयकडून विमानतळ जागेचे भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरु आहे तर दुसऱ्या बाजूला स्थानिक सातही गावातील शेतकऱ्यांनी आपला तीव्र विरोध पुन्हा एकदा जाहीर केला आहे. आम्हाला कोणताही मोबदला नको, आम्हाला आमची जमीन पाहिजे, शासनाने या साठी आमच्यावर जबरदस्ती करू नये. आम्हाला पुन्हा आंदोलन करायला भाग पाडू नये असा इशाराच शेतकऱ्यांनी शासनाला दिला आहे.

 

 

Web Title: Purandar airport land acquisition fast tracked 450 acres consented in just two days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • Farmer Protest
  • pune news
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट
1

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
2

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
3

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद
4

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.