Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदारासमोर तलाठ्याचे तर्राट कारनामे! मद्यधुंद अवस्थेत काहीच सुधरेना; पुढे जे काही झालं…

आमदार आवाडे यांनी डवरी यांना बोलावून चौकशी केली असता त्यांना धड बोलताही येत नव्हते. ते मद्यधुंद अवस्थेतच कामावर असल्याचे समजल्यानंतर आवाडे यांनी दूरध्वनीवरुन थेट वरिष्ठांशी संपर्क साधला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 01, 2025 | 08:18 PM
आमदारासमोर तलाठ्याचे तर्राट कारनामे! मद्यधुंद अवस्थेत काहीच सुधरेना; पुढे जे काही झालं...

आमदारासमोर तलाठ्याचे तर्राट कारनामे! मद्यधुंद अवस्थेत काहीच सुधरेना; पुढे जे काही झालं...

Follow Us
Close
Follow Us:

सहाय्यक तलाठी आढळला मद्यधुंद अवस्थेत
आमदार राहुल आवाडे करत होते सुशोभिकरण कामाची पाहणी
तलाठ्याचे तात्काळ निलंबित करण्याच्या सूचना

इचलकरंजी: जुना सांगली नाका परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभिकरण कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या आमदार राहुल आवाडे यांच्यासमोर सहाय्यक तलाठी मद्यधुंद अवस्थेत झोकांड्या खातच आल्याचे निदर्शनास आले. त्याची गांभीर्याने दखल घेत आमदार आवाडे यांनी सहाय्यक तलाठ्याचे वैद्यकिय तपासणी करुन तात्काळ निलंबित करण्याच्या सूचना वरिष्ठांना केल्या.

आमदार राहुल आवाडे यांनी शुक्रवारी जुना सांगली नाका परिसरात भेट देऊन रस्ता रुंदीकरणासंदर्भात माहिती जाणून घेतली. यावेळी इचलकरंजी तलाठी कार्यालयातील सहाय्यक तलाठी डवरी सकाळी सकाळीच फुल्ल टाईट असल्याचे व झोकांड्या खात असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले.

दूरध्वनीवरुन थेट वरिष्ठांशी संपर्क

आमदार आवाडे यांनी डवरी यांना बोलावून चौकशी केली असता त्यांना धड बोलताही येत नव्हते. ते मद्यधुंद अवस्थेतच कामावर असल्याचे समजल्यानंतर आमदार आवाडे यांनी दूरध्वनीवरुन थेट वरिष्ठांशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली. डवरी यांची तत्काळ वैद्यकिय तपासणी करुन त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना केल्या. आमदार पाहणी करण्यासाठी आले असताना शासकीय कार्यालयातील जबाबदार अधिकारी चक्क मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा दिवसभर रंगली होती.

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा

गेल्या काही महिन्यापासून इचलकरंजीत जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. जुगार अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांंकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी भोनेमाळ आणि शेळके मळा जॅकवेल रोड याठिकाणच्या जुगार अड्ड्यावर छापे मारले आहेत. या कारवाईत ६ दुचाकी, ९ मोबाईल व जुगाराचे साहित्य असा ३ लाख २२ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर १३ जणांना ताब्यात घेतले आहे.

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा, 13 जणांना घेतले ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोनेमाळ परिसरातील खंडेलवाल इ‌मारतीच्या पहिल्या मजल्यावर तीनपानी जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरुन शिवाजीनगर पोलिसांनी त्याठिकाणी छापा मारला. त्यावेळी तौसिफ रशिद मुल्ला (वय ३६ रा. गोकुळ चेंकि), अतुल चंद्रकांत पेटकर (वय २९), संकेत उमेश म्हात्रे (वय २९ दोघे रा. भोनेमाळ), केतन किरण घोरपडे (वय ३० रा. पाटील मळा) व वरुण जगदीश जगवाणी (वय २६ रा. यशवंत कॉलनी) हे पाचजण तीनपानी जुगार खेळताना मिळून आले. त्याचबरोबर जुगार अड्डा चालविणारा प्रकाश रविंद्र हुंडेकरी आणि इमारत मालक खंडेलवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ४ मोबाईल, रोकड, डिव्हीआर, जुगाराचे साहित्य असा १ लाख ७२ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सद्दाम गजबर सनदी यांनी फिर्याद दिली आहे.

 

Web Title: Rahul awade instructed to suspend talathi who was drunken in ichalkaranji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 08:17 PM

Topics:  

  • crime news
  • Ichalkaranji

संबंधित बातम्या

हिंजवडी परिसरात 18 वर्षीय मुलीवर चॉपरने हल्ला; धक्कादायक कारणही समोर
1

हिंजवडी परिसरात 18 वर्षीय मुलीवर चॉपरने हल्ला; धक्कादायक कारणही समोर

मोठी बातमी ! नागपूर विमानतळावर पाच कोटींचे ड्रग्ज जप्त; बँकॉकहून आलेला प्रवासी अटकेत
2

मोठी बातमी ! नागपूर विमानतळावर पाच कोटींचे ड्रग्ज जप्त; बँकॉकहून आलेला प्रवासी अटकेत

ज्येष्ठाची जागा बळकावण्याचा प्रयत्न, जेसीबीने कंपाऊंडच तोडले; बिल्डरासह चौघांवर गुन्हा दाखल
3

ज्येष्ठाची जागा बळकावण्याचा प्रयत्न, जेसीबीने कंपाऊंडच तोडले; बिल्डरासह चौघांवर गुन्हा दाखल

पाटसच्या यात्रेवर गुन्हेगारीचे सावट, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण; पोलिसांनी वेळीच लक्ष घालण्याची मागणी
4

पाटसच्या यात्रेवर गुन्हेगारीचे सावट, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण; पोलिसांनी वेळीच लक्ष घालण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.