Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TET Paper Leak: राज्यातील टीईटी पेपर लीकवरून राहुल गांधी आक्रमक! मुख्यमंत्री फडणवीसांसमोर ठेवल्या ‘या’ ३ मागण्या

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. परीक्षा रद्द होऊन दोन आठवडे उलटूनही नवीन तारखा जाहीर न केल्याबद्दल राहुल गांधींनी तीव्र चिंता व्यक्त केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 14, 2026 | 05:59 PM
राज्यातील टीईटी पेपर लीकवरून राहुल गांधी आक्रमक! मुख्यमंत्री फडणवीसांसमोर ठेवल्या 'या' ३ मागण्या (Photo Credit- X)

राज्यातील टीईटी पेपर लीकवरून राहुल गांधी आक्रमक! मुख्यमंत्री फडणवीसांसमोर ठेवल्या 'या' ३ मागण्या (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील टीईटी पेपर लीकवरून राहुल गांधी आक्रमक!
  • मुख्यमंत्री फडणवीसांसमोर ठेवल्या ‘या’ ३ मागण्या
  • जाणून घ्या काय आहे ते..
Rahul Gandhi On Maharashtra TET Exam: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे आणि त्यानंतर परीक्षा रद्द झाल्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. परीक्षा रद्द होऊन दोन आठवडे उलटूनही नवीन तारखा जाहीर न केल्याबद्दल राहुल गांधींनी तीव्र चिंता व्यक्त केली. ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांनी बाधित उमेदवारांच्या वतीने तीन प्रमुख मागण्या मांडल्या.

TET पेपरफुटीबाबत राहुल गांधींचे प्रश्न

पेपरफुटीमुळे महाराष्ट्र TET परीक्षा रद्द झाल्यानंतर नवीन तारीख जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी चिंता व्यक्त केली. त्यांनी मागणी केली की, नवीन तारीख त्वरित जाहीर करावी आणि बाधित उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत द्यावी. त्यांनी पुढे आरोप केला की, पेपरफुटी ही यंत्रणेची अपयश असतानाही, प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना त्याची किंमत मोजावी लागत आहे.

महाराष्ट्र TET का पेपर लीक हुआ, परीक्षा रद्द हुई। 6 लाख अभ्यर्थी अधर में। दो हफ्ते हो गए, नई तारीख़ का कोई अता-पता नहीं। लीक करने वाले आज़ाद, सिस्टम बेदाग़ और सज़ा भुगत रहा है वो जिसने ईमानदारी से मेहनत की। ये देश के कार्यरत और होने वाले शिक्षक हैं जिनके हाथ में भारत का भविष्य… — Rahul Gandhi (@RahulGandhi) July 14, 2026

६ लाख उमेदवारांचे भवितव्य अधांतरी

‘एक्स’वरील आपल्या पोस्टमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लिहिले की, महाराष्ट्र TET चा पेपर फुटला आणि परीक्षा रद्द झाली. ६ लाख उमेदवारांचे भवितव्य अधांतरी लटकले आहे. दोन आठवडे उलटूनही नवीन तारखेचा काहीच पत्ता नाही.

Rahul Gandhi: ‘मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या कष्टाशी खेळतंय’, UGC-NET पेपर लीकवरून राहुल गांधींचा आक्रमक हल्ला

मुख्यमंत्र्यांकडे राहुल गांधींच्या तीन मागण्या

वेळापत्रक: TET परीक्षेची नवीन तारीख त्वरित जाहीर करा.
जबाबदारी: पेपरफुटीस जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे, उमेदवारांवर नाही.
भविष्याचे रक्षण: या पेपरफुटीमुळे ज्या उमेदवारांचे वर्ष वाया गेले, त्यांना वयोमर्यादेत सवलत दिली जावी.

महाराष्ट्र TET पेपरफुटीच्या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधताना राहुल गांधींनी लिहिले की, ज्यांनी पेपर फोडला ते मोकाट फिरत आहेत आणि यंत्रणा सुरक्षित आहे, तर शिक्षा मात्र प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्यांना भोगावी लागत आहे. हे देशातील कार्यरत आणि भावी शिक्षक आहेत, ज्यांच्या हातात भारताचे भवितव्य आहे. हे तेच लोक आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे तयारी केली, अर्ज भरले, शुल्क भरले आणि दूरवरच्या परीक्षा केंद्रांपर्यंत प्रवास केला. आणि आता, ते केवळ वाट पाहत आहेत कोणतीही निश्चित तारीख नाही किंवा ठोस उत्तरही नाही. चूक संबंधित संस्थेची आहे, तरीही त्याचे परिणाम मात्र उमेदवारांना भोगावे लागत आहेत. हा न्याय नाही.

राहुल गांधी १७ जुलै रोजी पेपरफुटीच्या मुद्द्यावर भाष्य करणार

राहुल गांधी यांनी एका पोस्टद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी लिहिले की, १७ जुलै रोजी डेहराडून येथे ते पेपरफुटीच्या वाढत्या संकटाबाबत विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा करतील. आता शैक्षणिक क्रांतीची वेळ आली आहे अशी व्यवस्था निर्माण करण्याची वेळ, जिथे तरुणांना व्यवस्थेच्या अपयशाचे परिणाम भोगावे लागण्याऐवजी त्यांच्या कठोर परिश्रमांचे फळ मिळेल.

‘चीनने अरुणाचल प्रदेशातील भारताची जमीन बळकावली,’ प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मोदी सरकारला थेट सवाल

Web Title: Rahul gandhi takes a tough stance on the states tet paper leak puts forward these 3 demands before chief minister fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • Paper Leak Case
  • Rahul Gandhi
  • TET Exam

संबंधित बातम्या

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
1

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

‘जिभेवर लगाम ठेवा, नाहीतर गाठ काँग्रेसशी आहे!’ बावनकुळेंच्या विधानावर यशोमती ठाकूरांचा घणाघाती पलटवार
2

‘जिभेवर लगाम ठेवा, नाहीतर गाठ काँग्रेसशी आहे!’ बावनकुळेंच्या विधानावर यशोमती ठाकूरांचा घणाघाती पलटवार

Rahul Gandhi: पीएम मोदींची राहुल गांधींनी उडवली खिल्ली? ‘रामायण’ फेम सुनील लहरींनी व्यक्त केला संताप
3

Rahul Gandhi: पीएम मोदींची राहुल गांधींनी उडवली खिल्ली? ‘रामायण’ फेम सुनील लहरींनी व्यक्त केला संताप

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
4

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.