Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेश्या व्यवसाय चालणाऱ्या लॉजवर छापा; लॉजचालक अन् पिडीत तरूणीस पोलिसांनी घेतले ताब्यात

मंगळवेढा (Mangalwedha) ते सांगोला (Sangola) मार्गावरील लेंडवे चिंचाळे हद्दीत हॉटेल ज्ञानेश्‍वरी लॉजवर चालणार्‍या वेश्या व्यवसायादरम्यान डमी ग्राहक पाठवून पोलिस (Police) पथकाने छापा टाकून व्यवसायिक अविनाश विष्णू येडगे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी व २२ वर्षीय तरुणीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 17, 2023 | 10:28 AM
वेश्या व्यवसाय चालणाऱ्या लॉजवर छापा; लॉजचालक अन् पिडीत तरूणीस पोलिसांनी घेतले ताब्यात
Follow Us
Close
Follow Us:

मंगळवेढा : मंगळवेढा (Mangalwedha) ते सांगोला (Sangola) मार्गावरील लेंडवे चिंचाळे हद्दीत हॉटेल ज्ञानेश्‍वरी लॉजवर चालणार्‍या वेश्या व्यवसायादरम्यान डमी ग्राहक पाठवून पोलिस (Police) पथकाने छापा टाकून व्यवसायिक अविनाश विष्णू येडगे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी व २२ वर्षीय तरुणीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या कारवाईनंतर अन्य ठिकाणी चालणारे वेश्या व्यवसायावरही पोलिसांनी छापे टाकून संतांच्या भूमीतील वेश्या व्यवसाय पूर्णतः हद्दपार करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरिक्षक रणजित माने यांना मंगळवेढा-सांगोला मार्गावर लेंडवे चिंचाळे हद्दीत असलेल्या ज्ञानेश्‍वरी लॉजवर पैसे घेऊन अवैध मानवी व्यापार चालू आहे. अशी गोपनीय माहिती मिळताच त्यांनी पोलिस अधिक्षक शिरिषकुमार सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक सत्यजीत आवटे, पोलीस उपनिरिक्षक अशोक बाबर, सलीम शेख, सहाय्यक फौजदार अविनाश पाटील, महिला पोलीस नाईक सुनिता चवरे, व पोलीस शिपाई अंजना आटपाडकर यांच्या पथकाने सदर लॉजवर दि. १४ रोजी सायंकाळी ६.१० वा. बनावट ग्राहक पाठवून या व्यवसायाबाबत संपूर्ण माहिती जाणून घेवून त्याची पोलखोल केली. यावेळी ग्राहकाला १२०० रुपये मागण्यात आले. त्यामधील ५०० रुपये सदर पिडीतेस तर ७०० रुपये स्वतःच्या फायद्याकरीता आरोपीने ठेवून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. याची फिर्याद एका महिला पोलिसांनी दिल्यानंतर लॉज चालक अविनाश विष्णू येडगे (रा. तनाळी ता. पंढरपूर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून पिडीत महिला व आरोपीस ताब्यात घेण्यात आले.

पोलीस प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी

दरम्यान यापुर्वीही शहरापासून ८ कि.मी. अंतरावर चालणाऱ्या सोलापूर रोडवरील वेश्या व्यवसायावरून मोठे कांड घडले होते. दोन महिलांना पंढरपूर तालुक्यातून आलेल्या ग्राहकांनी केबलच्या सहाय्याने मारण्याचा प्रकार घडला होता. याबाबत पोलिसांत गुन्हाही दाखल झाला होता. भविष्यात वेश्या व्यवसायावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही याची पोलीस प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.

[blockquote content=”मंगळवेढा शहर हद्दीतील राष्ट्रीय महामार्गालगत चालणारा वेश्या व्यवसाय बंद करण्याबाबत मी पोलीस अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून बंद करण्याची मागणी केली आहे. कायदे सर्वाना समान असताना कारवाईत दुजाभाव पोलीस प्रशासन करीत आहे. हा वेश्याव्यवसाय चालत असल्याची संपूर्ण माहिती पोलीस प्रशासनास असतानाही कारवाईसाठी टाळाटाळ केली जाते. येथूनच कॉलेजला येणारे जाणारे विदयार्थी प्रवास करतात. या तरूण पिढीने काय आदर्श घ्यावा. संतांच्या भूमीत हा घाण व्यवसाय चालत असल्याने महिला वर्गाची कुचंबना होत आहे. हा वेश्या व्यवसाय तात्काळ बंद न झाल्यास शुक्रवारपासून पोलीस स्टेशनसमोर बोंबाबोंब आंदोलन करणार आहे.” pic=”” name=”- प्रभाकर देशमुख, अध्यक्ष जनहित शेतकरी संघटना”]

Web Title: Raid lodges operating prostitution the lodge manager and the young victim were taken into custody by the police nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2023 | 10:28 AM

Topics:  

  • ajit pawar
  • cmomaharashtra
  • maharashtra

संबंधित बातम्या

मालडबा ते ज्येष्ठांचा डबा; ‘परे’चा मोठा निर्णय! ३२ लोकलमध्ये विशेष कंपार्टमेंटची सुरुवात; ज्येष्ठांचा प्रवास सुलभ
1

मालडबा ते ज्येष्ठांचा डबा; ‘परे’चा मोठा निर्णय! ३२ लोकलमध्ये विशेष कंपार्टमेंटची सुरुवात; ज्येष्ठांचा प्रवास सुलभ

फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसईमध्ये मिळवले यश; पुण्यातील विद्यार्थ्यांचाही उत्कृष्ट निकाल
2

फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसईमध्ये मिळवले यश; पुण्यातील विद्यार्थ्यांचाही उत्कृष्ट निकाल

Pune News : कृषी विभागाचा दणका; पुणे जिल्ह्यातील15 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित
3

Pune News : कृषी विभागाचा दणका; पुणे जिल्ह्यातील15 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

कृषी विभागाचा राज्य सरकारला अहवाल; 8500 शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता
4

कृषी विभागाचा राज्य सरकारला अहवाल; 8500 शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.