Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृषी विभागाचा राज्य सरकारला अहवाल; 8500 शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

मार्च महिन्यात पुणे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे ४ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 19, 2026 | 12:31 PM
कृषी विभागाचा राज्य सरकारला अहवाल; 8500 शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

कृषी विभागाचा राज्य सरकारला अहवाल; 8500 शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:

पुणे : मार्च महिन्यात पुणे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे ४ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, कृषी विभागाने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधीतून ७ कोटी १३ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे ८ हजार ५०० शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

 

२५० गावांना पावसाचा फटका

पुणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरीस विविध ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिठीने हजेरी लावली होती. याचा सर्वाधिक फटका अडीचशे गावांतील शेतीला बसला आहे. प्रामुख्याने बागायती आणि बहुवार्षिक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने युदधपातळीवर काम करत नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार केला आहे.

भरपाईचे निकष जाहीर

जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी तयार केलेला हा अहवाल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मान्य केला असून, तो विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे. शासनाच्या २७ मार्च २०२३ च्या निर्णयानुसार ही मदत दिली जाणार आहे. यामध्ये खालीलप्रमाणे भरपाई प्रस्तावित आहे.

कोरडवाहू पिके : ८,५०० रुपये प्रति हेक्टर
बागायती पिके : १७,००० रुपये प्रति हेक्टर
बहुवार्षिक पिके (फळबागा) : २२,५०० रुपये प्रति हेक्टर

शेतकऱ्यांचे डोळे मदतीकडे

अवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने आपला अहवाल सादर केल्यामुळे आता राज्य सरकार या निधीला कधी मंजुरी देते आणि प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बाधित क्षेत्र : ४,००० हेक्टर
बाधित शेतकरी : ८,५००
एकूण मागणी : ७ कोटी १३ लाख रुपये
बाधित गावे : २५०

हे सुद्धा वाचा : पुणे शहरात अक्षय तृतीयेची लगबग, विविध मंदिरांमध्ये पूजा; अभिषेक अन् धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Web Title: The agriculture department has sent a report on the losses suffered by farmers to the state governmen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 12:31 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

श्वास रोखायला लावणारा थरार! मायटी स्टार्सचा १ रन्सचा विजय तर…; DSP Cricket League मध्ये काय घडले?
1

श्वास रोखायला लावणारा थरार! मायटी स्टार्सचा १ रन्सचा विजय तर…; DSP Cricket League मध्ये काय घडले?

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
2

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण;  १,००० कोटींचा नवोपक्रम निधी
3

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण; १,००० कोटींचा नवोपक्रम निधी

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
4

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.