Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Rain : रायगड जिल्ह्याला अवकाळीने झोडपलं; माथेरानमध्ये रिमझिम पावसाची हजेरी

वातावरण थंडगार वाऱ्याची झुळूक आणि सोबत ढगाळ वातावरण यामुळे सायंकाळच्या वेळी अवकाळी पाऊस हजेरी लावणार अशी अटकळ बांधली जात होती.गेली चार दिवस वातावरणात ढगाळ होते आणि त्याचा परिणाम उष्णतेचे प्रमाण वाढले होते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 04, 2025 | 08:20 PM
Raigad Rain : रायगड जिल्ह्याला अवकाळीने झोडपलं; माथेरानमध्ये रिमझिम पावसाची हजेरी
Follow Us
Follow Us:

रायगड /संतोष पेरणे/ विजय मोकल :  कर्जत तालुक्यात आज सायंकाळी आलेल्या अवकाळी पावसाने सर्व भागाला झोडपले असून वातावरणात चांगला गारवा निर्माण झाला आहे. माथेरान मध्ये तब्बल दोन तास पावसाची रिमझिम सुरू होती आणि त्यामुळे परिसरात आणखी गारवा निर्माण झाला आहे.आज दुपार पासून वातावरण थंडगार वाऱ्याची झुळूक आणि सोबत ढगाळ वातावरण यामुळे सायंकाळच्या वेळी अवकाळी पाऊस हजेरी लावणार अशी अटकळ बांधली जात होती.गेली चार दिवस वातावरणात ढगाळ होते आणि त्याचा परिणाम उष्णतेचे प्रमाण वाढले होते.

हवामान उष्ण झाल्याने सर्वांना अवकाळी पावसाचा शक्यता वाटत होती. त्यात चार वाजण्याच्या सुमारास ढग देखील गडगडू लागले होते आणि त्यामुळे अवकाळी पाऊस हजेरी लावणार असे वातावरण तयार झाले.शेवटी काही वेळातच कर्जत तालुक्याच्या बहुसंख्य भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि वातावरणात थंडगार केले.मात्र या अवकाळी पावसाने कर्जत तालुक्यातील विट भट्टी उत्पादक यांचे मोठे नुकसान झाले असून बनवून ठेवलेल्या विटांवर पाण्याचे थेंब पडल्याने मोठया प्रमाणावर विटा खराब झाल्या असून त्या पुन्हा बनविण्याची वेळ व्यवसायिक यांच्यावर येणार आहे.त्रा भाजीपाला पीक घेणारे शेतकरी यांना देखील अवकाळी पिकाचा त्रास होणार आहे.यावर्षी आंबा पीक काही प्रमाणात तयार झाले असल्याने आजच्या अवकाळी पावसाने फार नुकसान शेतकऱ्यांचे होणार नाही असे कृषी विभाग सांगत आहे.

माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.त्यात दीड ते दोन तास पाऊस सुरू होता.माथेरान शहरातील सर्व भागात पावसाची रिमझिम सुरू होती आणि त्यामुळे पावसाने माथेरान मधील काही दिवस ढगाळ हवामानामुळे वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत झाली आहे.आज मोठ्या प्रमाणात पर्यटक नव्हते मात्र जे पर्यटक माथेरान शहरात होते त्यांनी अवकाळी पावसाचा भिजून आनंद घेतला.

पेणमध्ये अवकाळी पावसाच्या सरीने उडाली तारांबळ

पेणमध्ये अवकाळी पावसाच्या सरी जोरदार बरसल्याने पेणकारांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत होते.
पेण तालुक्यात अवकाळी पावसाने शेती आणि फळबागांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि फळबागायतदारांची चिंता वाढली आहे.
अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेतीमधील पीक खराब झाले आहे, तर काही ठिकाणी मळणीसाठी ठेवलेले पीक भिजल्याने नुकसान झाले आहे.
पेण तालुक्यात आंबा आणि काजू यांसारख्या फळबागांवर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा परिणाम होत आहे. ज्यामुळे कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

वीटभट्टी आणि बांधकाम व्यवसायावर परिणाम

अवकाळी पावसामुळे वीटभट्टी आणि बांधकाम व्यवसायावरही परिणाम झाला आहे. हवामान ढगाळ झाल्याने आंबा आणि काजू फळ उत्पादन धोक्यात आले आहे, त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आंबा, भाजीपाला, वीटभट्टी, मिठागरे आणि बांधकाम व्यवसायाला फटका बसला आहे. रायगड जिल्हासह राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरीने बरसल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये हवामान विभागाकडून पाच ते सात एप्रिलदरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून मुंबईसाठी पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचे असणार असून काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.पेण तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पूर्व विभागातील दुबार शेती पिकाचं मोठं नुकसान झाले आहे. मीठ व्यावसायीक वीट व्यावसायिक यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Web Title: Raigad rain unseasonal rain hits raigad district drizzling rain in matheran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 07:48 PM

Topics:  

  • Karjat
  • raigad
  • Raigad News

संबंधित बातम्या

Rain Alert: या जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; आज (२ जुलै) शाळांना सुट्टी जाहीर, तुमच्या भागातील शाळा बंद राहणार का? जाणून घ्या
1

Rain Alert: या जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; आज (२ जुलै) शाळांना सुट्टी जाहीर, तुमच्या भागातील शाळा बंद राहणार का? जाणून घ्या

Matheran News : रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता! माथेरान मिनी ट्रेन फाटकाजवळ खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालक हैराण
2

Matheran News : रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता! माथेरान मिनी ट्रेन फाटकाजवळ खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालक हैराण

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष
3

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष

Karjat News : ‘सनाधरा रिसॉर्ट’मध्ये मृत्यूचा सापळा; निष्काळजीपणामुळे दोन मजले कोसळले, स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी
4

Karjat News : ‘सनाधरा रिसॉर्ट’मध्ये मृत्यूचा सापळा; निष्काळजीपणामुळे दोन मजले कोसळले, स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.