Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: आश्रमशाळेच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप; चौकशीची मागणी जोर धरणार?

Raigad News: रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चाफेवाडी येथील शासकीय आश्रमशाळेत सुरू असलेल्या बांधकामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आश्रमशाळेत निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 08, 2026 | 02:33 PM
आश्रमशाळेच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप; चौकशीची मागणी जोर धरणार?

आश्रमशाळेच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप; चौकशीची मागणी जोर धरणार?

Follow Us
Follow Us:
  • चाफेवाडी येथील शासकीय आश्रमशाळेत सुरू असलेल्या बांधकामांवर नियंत्रण कोणाचे?
  • कर्जत तालुक्यातील कामे ठाणे बांधकाम विभागाकडे..
  • निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा व्यवस्थापन समिती अध्यक्षांचा आरोप
Raigad News: कर्जत तालुक्यातील चाफेवाडी येथे असलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळा यांच्या नवीन इमारतींचे आणि वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहेत. हे सर्व कर्जत तालुका असून रायगड जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून या इमारती बांधण्यात येत नाहीत.वसतिगृहाचे बांधकाम करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या मातीच्या विटा कच्च्या असून त्या हातात घेताच तुटत आहेत.दरम्यान, असे निकृष्ट बांधकाम होत असताना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

कर्जत तालुका आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात आदिवासी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी शासनाने आदिवासी विकास विभागाचे माध्यमातून शासकीय आश्रमशाळा चालवल्या जातात. कर्जत तालुक्यात चाफेवाडी, भालीवडी,पिंगळस आणि पाथरज या ठिकाणी शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहेत. यातील चाफेवाडी येथील शासकीय आश्रमशाळा इमारत आणि वसतिगृह बांधण्याचे काम मंजूर व्हावे यासाठी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शासन दरबारी प्रयत्न केले.त्यानंतर तेथील तिनमजली शाळेच्या इमारतीसाठी सहा कोटी आणि वसतिगृह इमारतीच्या बांधकामासाठी सव्वा आठ कोटी मंजूर झाले आहेत.

Navratri Traffic: कल्याणमध्ये नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ ७ मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी

१५ कोटींचा निधी मंजूर

ही कामे मंजूर व्हावीत यासाठी कर्जत चे आमदार थोरवे यांचे प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केली जाणारी कामे ही ठाणे जिल्ह्यातील ठेकेदार करीत आहेत.या दोन्ही इमारतींचे बांधकामासाठी साधारण १५ कोटींचा निधी मंजूर आहे.पण ठेकेदार यांच्याबरोबर त्या कामांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी देखील ठाणे जिल्ह्याच्या बांधकाम विभागावर देण्यात आली आहे.कर्जत तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय कार्यालय असताना ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत कर्जत तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा यांच्या कामांची जबाबदारी कशी? असा प्रश्न समोर आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बांधकाम खात्याकडे आश्रमशाळा यांच्या इमारतीचे जबाबदारी देण्यात आल्याने तेथे नित्कृष्ट दर्जाची कामे सुरू आहेत. बांधकाम खात्याचे अधिकारी ठाणे येथून कर्जत येथे कसे येणार असा प्रश्न असून अधिकारी वर्ग आश्रमशाळा येथे पाहण्यासाठी येत नसल्याने आश्रमशाळेच्या वसतिगृह आणि शाळेचे इमारतीचे काम नित्कृष्ट दर्जाचे सुरू आहे.त्या ठिकाणी असलेल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप गोरे यांनी बांधकामाला जोरदार आक्षेप घेतला आहे.तेथे बांधकामासाठी आणलेल्या विटा हातातून पडल्यावर लगेच तुटत आहेत.

तर वसतिगृह इमारतीच्या पोर्च चे काम सुरू आहे,तेथे खोल खड्डा असून तेथे कोणी विद्यार्थी रात्रीच्या अंधारात पडला तर हाडे तुटल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे अशा प्रकारच्या बांधकामासाठी नियोजन करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी कसे नियोजन केले असा जाहीर प्रश्न केले आहेत.आश्रमशाळेत शिकणारे विद्यार्थी आदिवासी असून नित्कृष्ट दर्जाचे बांधकाम झाले असून ते बांधकाम भविष्यात कोसळले तर काय होणार? असा प्रश्न पालकांनी केला आहे.या नित्कृष्ट कामामुळे भविष्यात इमारत कोसळली तर आदिवासी समाजाचे विद्यार्थी यांचे बळी जाऊ शकतात.

आमदारांनी लक्ष घालावे.. प्रदीप गोरे

कर्जत तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळा येथील बांधकामे ठाणे जिल्ह्यातील अधिकारी पाहणी करतात.आपल्या आमदारांनी अशी खराब कामे रोखण्यासाठी तत्काळ लक्ष घालावे अशी विनंती आहे, अशी माहिती प्रदीप गोरे यांनी दिली.

Navratri Traffic: कल्याणमध्ये नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ ७ मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Web Title: Karjat chafewadi government ashram school construction poor quality work allegations thane pwd sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • education news
  • Karjat
  • raigad

संबंधित बातम्या

byteXL च्या विकासाला मिळाले बूस्ट; नव्या फंडिंग फेरीत ‘एवढ्या’ दशलक्ष डॉलर्सची कमाई
1

byteXL च्या विकासाला मिळाले बूस्ट; नव्या फंडिंग फेरीत ‘एवढ्या’ दशलक्ष डॉलर्सची कमाई

Torrent Project : ‘अडाणी शेतकरी’ शब्दावरून वाद पेटला… Karjat मध्ये भूसंपादन सुनावणीत मोठा राडा! थेट जनसुनावणी बंद पाडली
2

Torrent Project : ‘अडाणी शेतकरी’ शब्दावरून वाद पेटला… Karjat मध्ये भूसंपादन सुनावणीत मोठा राडा! थेट जनसुनावणी बंद पाडली

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
3

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Neral News: नळाच्या पाण्यात चक्क साप! नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह; नागरिकांमध्ये खळबळ
4

Neral News: नळाच्या पाण्यात चक्क साप! नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह; नागरिकांमध्ये खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.