Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alibag News: तिकिटामागे ₹2 स्वच्छता अधिभार, तरी एसटी बस चिखलाने माखलेल्या; ‘नोटेड’ च्या पलीकडे कारवाई कधी? प्रवाशांचा संताप

Alibag ST Bus: अलिबाग आगारातून धावणाऱ्या एसटी बसच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे ₹2 स्वच्छता अधिभार घेतला जात असतानाही बसच्या अस्वच्छ अवस्थेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 12, 2026 | 10:44 AM
Alibag News: तिकिटामागे ₹2 स्वच्छता अधिभार, तरी एसटी बस चिखलाने माखलेल्या; ‘नोटेड’ च्या पलीकडे कारवाई कधी? प्रवाशांचा संताप

Alibag News: तिकिटामागे ₹2 स्वच्छता अधिभार, तरी एसटी बस चिखलाने माखलेल्या; ‘नोटेड’ च्या पलीकडे कारवाई कधी? प्रवाशांचा संताप

Follow Us
Follow Us:
  • अलिबाग-शेगाव बसच्या काचा चिखलाने माखलेल्या असून, आतील भागही अस्वच्छ असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
  • प्रवाशांकडून तिकिटामागे ₹2 स्वच्छता अधिभार घेतला जात असताना, स्वच्छतेची योग्य व्यवस्था का होत नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.
  • महिनाभर तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून केवळ ‘नोटेड’ उत्तर मिळत असल्याने प्रत्यक्ष कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
अलिबाग: प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे ₹२ स्वच्छता अधिभार आकारला जात असताना अलिबाग आगारातून धावणाऱ्या एसटी बसच्या स्वच्छतेचा मात्र बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. अलिबाग-शेगाव मार्गावर धावणाऱ्या बसच्या चिखलाने माखलेल्या काचा, अस्वच्छ आतील भाग आणि पावसाळ्यात बसमधून प्रवाशांच्या अंगावर उडणारा काळा चिखल यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप रायगड एसटी प्रेमी संघटनेने केला आहे. यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओ संबंधित एसटी अधिकाऱ्यांना पाठवूनही त्यावर केवळ ‘नोटेड’ असे उत्तर मिळत असल्याने, ‘नोटेड करण्यापलीकडे प्रत्यक्ष कारवाई कधी होणार?’ असा संतप्त सवाल आता एसटी प्रेमी संघटनेने उपस्थित केला आहे.

Bhandara News: एकलारीत वीजतारा तुटून ३ शेळ्यांचा मृत्यू! महावितरणाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

अलिबाग-शेगाव बसच्या काचा चिखलाने माखलेल्या

अलिबाग-शेगाव मार्गावरील सकाळच्या बसच्या स्वच्छतेबाबत तक्रार करताना संबंधित बसच्या काचा अजिबात स्वच्छ केल्या जात नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. ३० जुलै रोजी धावलेल्या अलिबाग-शेगाव बसचे छायाचित्र व व्हिडिओ अधिकाऱ्यांना पाठवून ‘गाडी वॉशिंग केलेली आहे का?’ असा थेट सवाल करण्यात आला. बसच्या काचा चिखलाने इतक्या माखलेल्या होत्या की, त्यातून बाहेरील रस्ता व परिसर स्पष्ट दिसत नसल्याचे व्हिडिओतून निदर्शनास येते. त्यामुळे प्रवाशांना अस्वच्छतेचा त्रास तर होतोच, शिवाय चालकाच्या दृश्यतेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

प्रवाशांचे कपडेही होतात खराब

पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या चिखलाचे पाणी बसच्या चाकांमुळे उडून खिडक्यांवर येते. विशेषतः नवीन BS-6 बसमध्ये पुढील टायरमधून उडणारा काळा चिखल मागील खिडक्यांवर येत असून, काही वेळा खिडकी उघडी असताना तो थेट प्रवाशांच्या अंगावर उडतो, अशी तक्रार करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे कपडे खराब होत असून, स्वच्छता अधिभार घेऊनही प्रवाशांना अस्वच्छ बसमधून प्रवास करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

‘स्वच्छता अधिभार कशासाठी?’

प्रवाशांकडून तिकिटामागे ₹२ स्वच्छता अधिभार घेतला जातो. मग हा अधिभार नेमका कुठे खर्च केला जातो, असा सवाल रायगड एसटी प्रेमी संघटनेने केला आहे. बसची नियमित धुलाई, काचा स्वच्छ करणे, सीट व आतील भागाची स्वच्छता करणे यासाठी व्यवस्था असताना प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसेल तर स्वच्छता अधिभाराचा उपयोग तरी काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

महिनाभरापासून तक्रारी; अधिकाऱ्यांकडून केवळ ‘नोटेड’

रायगड एसटी प्रेमी संघटनेतर्फे मागील महिनाभरापासून अलिबाग आगार व्यवस्थापक आणि रायगड विभाग नियंत्रकांकडे बसच्या स्वच्छतेबाबत तक्रारी करण्यात येत आहेत. बसच्या अवस्थेचे फोटो आणि व्हिडिओही संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत. मात्र, तक्रारीवर ‘नोटेड’ असे उत्तर दिल्यानंतर प्रत्यक्षात काय कारवाई झाली, याबाबत स्पष्टता नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. एका तक्रारीनंतर संबंधित कंपनीला दंड करण्याचा पर्याय असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. तसेच बस धुण्याच्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचेही कारण पुढे करण्यात आले. मात्र, मनुष्यबळाचा अभाव किंवा संबंधित कंपनीची अडचण याचा फटका प्रवाशांनी का सहन करावा? असा सवाल संघटनेने केला आहे.

शेगाव संस्थानच्या स्वच्छतेचा आदर्श घ्यावा

अलिबाग-शेगाव मार्गावरील बससेवेच्या संदर्भात शेगाव संस्थानमधील स्वच्छतेच्या काटेकोर व्यवस्थेचाही दाखला देण्यात आला आहे. मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक येत असलेल्या शेगावसारख्या ठिकाणी स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते. त्याचप्रमाणे एसटीसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही प्रवाशांकडून स्वच्छता अधिभार घेतला जात असल्याने स्वच्छ, नीटनेटकी आणि सुरक्षित बस उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, अशी मागणी करण्यात आली आहे.

समीर रांजणकर यांचा थेट सवाल

रायगड एसटी प्रेमी संघटनेचे समीर रांजणकर यांनी या प्रकाराकडे रायगड विभाग नियंत्रकांचे लक्ष वेधले आहे. प्रत्यक्ष परिस्थितीचे फोटो-व्हिडिओ पाठवून तक्रारी करूनही केवळ ‘नोटेड’ करून विषय संपवू नये, तर संबंधित ठेकेदार किंवा कंपनीवर नियमानुसार कारवाई करून बसच्या स्वच्छतेची नियमित तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा

‘फक्त नोटेड करत राहणार की त्याची अंमलबजावणीही करणार?’ असा सवाल करत रांजणकर यांनी एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रवाशांकडून स्वच्छतेच्या नावाखाली घेतला जाणारा प्रत्येक दोन रुपयांचा हिशेब आणि त्यातून मिळणाऱ्या सुविधांचा जाब एसटी प्रशासनाने द्यावा, तसेच अलिबाग आगारातील सर्व बसची अचानक तपासणी करून स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या संबंधित कंपनीवर आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी रायगड एसटी प्रेमी संघटनेने केली आहे.

Web Title: Alibag st buses face cleanliness issues despite 2 rupees sanitation surcharge per ticket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • Alibag
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
1

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
2

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
3

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
4

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.